प्रियजनांमध्ये महिला असुरक्षित, NCRB ची धक्कादायक आकडेवारी आली समोर

NCRB: उत्तराखंड हे गुन्हेगारीच्या दृष्टिकोनातून शांत राज्य मानले जाते.
Women
WomenDainik Gomantak
Published on
Updated on

Uttarakhand: उत्तराखंड हे गुन्हेगारीच्या दृष्टिकोनातून शांत राज्य मानले जाते, मात्र गेल्या काही वर्षांपासून महिलांविरोधातील गुन्ह्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. महिला केवळ बाहेरच नाही तर ओळखीच्या आणि मित्रांमध्येही सुरक्षित नाहीत. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या अहवालाने याची पुष्टी केली आहे.

अहवालानुसार, 2021 मध्ये उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) बलात्काराच्या 522 घटना घडल्या. त्यापैकी 97 प्रकरणांमध्ये बलात्कार पीडित महिला आणि मुलींच्या ओळखीच्या व्यक्तींचाच समावेश आहे. बलात्कार पीडितेची फसवणूक झाल्याची 506 प्रकरणे आहेत. 351 प्रकरणांमध्ये कौटुंबिक मित्रांनी, तर 155 प्रकरणांमध्ये पीडितांच्या जवळच्या नातेवाईकांनी बलात्कार केला.

Women
NCRB: दिल्ली महिलांसाठी सर्वात 'असुरक्षित', जाणून घ्या या मोठ्या शहरांची रॅंकिंग

अहवालानुसार, बलात्काराच्या 522 प्रकरणांपैकी केवळ 12 प्रकरणे अशी आहेत, ज्यात अज्ञात लोकांचा सहभाग होता. याशिवाय 16 प्रकरणात कुटुंबीयांची नावे समोर आली आहेत. गृह मंत्रालयाचा हा अहवाल उत्तराखंडमध्ये महिलांवरील (Women) लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनांचा पुरावा आहे.

हुंड्यासाठी खून, अपहरणाच्या घटनांमध्येही वाढ झाली

उत्तराखंडमध्ये हुंडा हत्येच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. पोलिसांच्या अहवालानुसार, 2020 मध्ये हुंडाबळीच्या 63 गुन्ह्यांची नोंद झाली होती, तर 2021 मध्ये हा आकडा 70 वर पोहोचला होता. महिलांच्या अपहरणाच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. याशिवाय, वर्षभरात महिलांच्या अपहरणाच्या घटना 237 वरुन 370 वर पोहोचल्या आहेत. 2020 मध्ये महिलांच्या तस्करीची आठ प्रकरणे नोंदवण्यात आली होती, तर 2021 मध्ये ही संख्या 33 वर पोहोचली होती.

Women
NCRB Data: महिलांसाठी कोलकाता भारतातील सर्वात सुरक्षित शहर

देशभरात उत्तराखंड 15 व्या क्रमांकावर

बलात्काराच्या घटनांमध्ये उत्तराखंड देशात 15 व्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर राजस्थान (6074), दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश (2898), तिसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) (2668), चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्र (2496), पाचव्या क्रमांकावर असम (1709), सहाव्या क्रमांकावर हरियाणा (Haryana) (1697), सातव्या क्रमांकावर झारखंड (1298), आठव्या क्रमांकावर आंध्र प्रदेश (1298), नवव्या क्रमांकावर छत्तीसगड (1088) आणि दहाव्या क्रमांकावर पश्चिम बंगाल (911) आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com