African Swine Flu In Kerala: केरळच्या कोट्टायमध्ये डुकरांना आफ्रिकन स्वाईन फ्लुची लागण

खासगी पिग फार्ममधील 48 डुकरांना ठार मारले, मांस वाहतुक, विक्रीवर निर्बंध
African swine fever
African swine feverDainik Gomantak
Published on
Updated on

African Swine Flu: केरळमध्ये एव्हियन फ्लूचा धोका टळलेला नसतानाच आता कोट्टायम जिल्ह्यातील एका खासगी पिग फार्ममध्ये आफ्रिकी स्वाईन फ्लुचा प्रकार समोर आला आहे. येथील एका डुकराचा आफ्रिकन स्वाईन फीव्हरने मृत्यू झाल्यानंतर या फार्ममधील 48 डुकरांना ठार मारण्यात आले आहे.

African swine fever
Indian Defence Ministry: नोकरी देण्यात संरक्षण मंत्रालय जगात भारी; अमेरिका, चीनसह वॉलमार्ट, अॅमेझॉनलाही टाकले मागे

शास्त्रज्ञ राहुल एस. म्हणाले की, कोट्टायम जिल्ह्यात 13 ऑक्टोबर रोजी डुकरांना आफ्रिकन स्वाईन फीव्हरचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर गेल्या 2-3 दिवसात फार्ममधील 6-7 डुकरांचा मृत्यू झाला आहे. नमुने तपासणीसाठी पाठवले गेले आहे, तिथेच या व्हायरसला दुजोरा मिळेल.

या पिग फार्ममध्ये एकुण 67 डुक्कर होते, त्यातील 19 डुकरांचा आधीच मृत्यू झाला होता. तर 48 डुकरांना आम्ही ठार मारले आहे, अशी माहिती राहुल एस. यांनी दिली. या भागामध्ये जनावरांची वाहतुक, विक्री, जनावरांच्या मांसाची विक्री यावर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

African swine fever
Gujarat Assembly Election 2022: गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी केजरीवाल यांनी लोकांकडून मागवले पर्याय

आफ्रिकन स्वाईन फ्लू असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने निर्देश जारी केले आहेत. डुकराचे मांस विक्री करणारी दुकाने बंद केली गेली आहेत. संसर्गग्रस्त भागातून कुणीही डुक्कर नेऊ नये, याची खबरदारी घेतली जात आहे. आफ्रिकन स्वाईन फ्लू हा एक विषाणुजन्य आजार आहे.

याचा मृत्यू दर १०० टक्के पर्यंत असू शकतो. या विषाणुमुळे पाळीव आणि जंगली जनावरेही बाधित होऊ शकतात. या विषाणुचा मानवावर काहीही परिणाम होत नाही. तथापि, शारिरीक संपर्कातून एका डुकरातून हा विषाणू दुसऱ्या डुकरात पोहचतो.

यापुर्वी बर्ड फ्लु झाल्याने केरळमधील अनेक पोल्ट्रीमधील कोंबड्यांना ठार मारून त्यांची विल्हेवाट लावली गेली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com