Indian Defence Ministry: नोकरी देण्यात संरक्षण मंत्रालय जगात भारी; अमेरिका, चीनसह वॉलमार्ट, अॅमेझॉनलाही टाकले मागे

भारतीय लष्कराच्या तिन्ही दलात मिळून 29 लाख 20 हजार जणांना नोकरी
Indian Defence Ministry
Indian Defence MinistryDainik Gomantak
Published on
Updated on

Indian Defence Ministry: भारताचे संरक्षण मंत्रालय ही जगात सर्वाधिक नोकऱ्या देणारा विभाग ठरला आहे. संरक्षण मंत्रालयाने 29 लाख 20 हजार लोकांना रोजगार दिला आहे. याबाबतीत भारताच्या संरक्षण मंत्रालयाने महासत्ता अमेरिका आणि जगात सर्वाधिक मोठे भुदल असलेल्या चीनलाही मागे टाकले आहे.

Indian Defence Ministry
S. Jaishankar: जगभरात ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ल्याचा धोका

जर्मनीतील स्टॅटिस्टा इन्फोग्राफिक (Statista infographic) या संस्थेच्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. स्टॅटिस्टा या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे की, 29 लाख 20 हजार जणांना रोजगार देणे, हा मोठा आकडा आहे. विशेष म्हणजे, एखाद्या विभागात किंवा संस्थेत कार्यरत कमर्चाऱ्यांची ही जगात सर्वाधिक संख्या आहे.

यात लष्कराच्या भूदल, नौदल आणि हवाईदल अशा तिन्ही दलातील सर्व विभागातील नोकऱ्यांचा समावेश आहे. एकंदरीत नोकरी देण्यात भारताचे संरक्षण मंत्रालय जगात अव्वल स्थानी आहे. या बाबतीत संरक्षण मंत्रालयाने अमेरिका आणि चीन या देशांनाही मागे टाकले आहे.

स्टॅटिस्टा ही एक खासगी संस्था आहे, जी जगभरातील विविध बाबतीतील आकडेवारी तयार करून प्रसिद्ध करत असते. स्टॅटिस्टा-2022 अहवालात म्हटले आहे की, अमेरिकेचा संरक्षण विभाग पेंटॅगॉनशी संबंधित सर्व विभागांनी 29 लाख 10 हजार नोकऱ्या दिल्या आहेत. तर सर्वाधिक नोकऱ्या देणाऱ्या संस्थांच्या या क्रमवारीत चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा (पीएलए) तिसरा क्रमांक लागतो. 'पीएलए'ने 25 लाख नोकऱ्या दिल्या आहेत.

Indian Defence Ministry
Earthquake in South Korea: दक्षिण कोरियात पुन्हा भूकंप, या वर्षातील सर्वात मोठा धक्का

वॉलमार्टमध्ये 23 लाख तर अॅमेझॉनमध्ये 16 लाख कर्मचारी

अहवालात म्हटले आहे की, खासगी कंपन्यांचा विचार केला असता जगात वॉलमार्ट या कंपनीत सर्वाधिक 23 लाख कर्मचारी आहेत तर त्याखालोखाल अॅमेझॉनमध्ये 16 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. या दोन्ही कंपन्या अमेरिकेच्या असून जगभरात त्यांचा पसारा आहे.

लष्करावर खर्च करण्यात भारत तिसऱ्या स्थानी

जागतिक स्तरावर सैन्यावरील खर्चात २०२१ मध्ये वाढ होऊन हा खर्च 2113 अब्ज डॉलरवर पोहचला आहे. स्टॉकहोम इंटरनेशनल पीस रिसर्च इंस्टीट्यूट (SIPRI) च्या अहवालानुसार जगात अमेरिका, भारत, चीन, ब्रिटन आणि रशिया लष्करावर मोठा खर्च करतात. अमेरिकेने 2021 मध्ये लष्करावर 801 अब्ज डॉलर खर्च केले, चीनने 293 अब्ज डॉलर तर भारताने 76.6 अब्ज डॉलर खर्च केले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com