Anand Mahindra
Anand MahindraDainik Gomantak

Anand Mahindra: झोप पुर्ण होत नसेल तर... उद्योगपती आनंद महिंद्रांच्या पत्नीचा अबज सल्ला व्हायरल...

ट्विटला हजारो लाईक्स, रिट्विट्स ; नेटकऱ्यांमध्ये चर्चा

Anand Mahindra: भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा हे ट्विटरवर चांगलेच सक्रीय असतात. त्यामुळेच बऱ्याचदा त्यांच्या खुसखुशीत ट्विट आणि इतरांच्या ट्विटवरील त्यांच्या प्रतिक्रियेच्या बातम्या होत असतात. आताही महिंद्रा यांचे असेच एक ट्विट चर्चेत आले आहे. त्यात त्यांच्या पत्नीने दिलेल्या अजब सल्ल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू झाली आहे.

Anand Mahindra
Morbi Bridge Case: जास्त हुशारी दाखवू नका, प्रश्नांची उत्तरे द्या! हायकोर्टाने मोरबी नगरपालिकेला फटकारले

मंगळवारी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एका व्यक्तीचे ट्विट रिट्विट करताना हे मला उद्देशूनच लिहिले असावे, कारण खूप वर्षांपुर्वी माझ्या पत्नीनेही मला हाच सल्ला दिला होता, असे म्हटले होते. हल्ली झोप न येण्याचा प्रॉब्लेम अनेकांना जाणवतो. त्यावरून हे ट्विट केले गेले होते. त्यावर पत्नीने दिलेला अबज सल्लाही महिंद्रा यांनी सांगितला आहे. त्या ट्विटमध्ये जे म्हटले आहे तेच महिंद्रा यांच्या पत्नीचेही मत असल्याचे त्यातून कळते.

काय आहे प्रकरण?

मंगळवारी आनंद महिंद्रा यांनी Erik Solheim यांचे एक ट्विट रीट्विट केले. त्यावर त्यांनी लिहिले की, असे वाटते की, तुमचे हे टविट माझ्यासाठीच आहे. तथापि, माझ्या पत्नीने मला खूप आधीच हा सल्ला देऊन ठेवला होता. तिच्याकडे ना कुठली वैद्यकीय पदवीदेखील नाही. महिंद्रांच्या या ट्विटला हजारो लाईक्स मिळाले आहेत तसेच ते शेकडो नेटकऱ्यांनी ते रिट्विटही केले आहे. त्यावर अनेकांनी मजेशीर कॉमेंटही केल्या आहेत. एकाने लिहिले आहे की, माझ्या पत्नीही मला रोज हेच सांगते. अन्य एकाने लिहिले आहे की, नक्कीच हे एखाद्या डॉक्टरांनी लिहिलेले नाही.

Anand Mahindra
Shraddha Murder Case: देहरादूनचे खून प्रकरण श्रद्धापेक्षाही भयानक, पत्नीचे केले होते 72 तुकडे

या ट्विटमध्ये काय लिहिले आहे?

4 नोव्हेंबर रोजी Erik Solheim यांनी डॉक्टरांनी रूग्णाला दिलेल्या एका प्रिस्किप्शनचा फोटो ट्विट केला होता. त्यात लिहिले होते की, रेकमेंडेड ट्रीटमेंट. त्यावर लिहिले होते की, आरएक्स प्रिस्क्रिप्शन... रूग्णाचे नाव- आनंद, डायग्नोज- झोप न येणे, रेकमेंडेड ट्रीटमेंट- तुमचा फोन आणि कॉम्प्युटर लांब फेकून द्या. त्यावर आनंद महिंद्रा यांनी म्हटले होते की, माझ्या पत्नीनेही खूप वर्षांआधी मला हाच सल्ला दिला होता की, कॉम्प्युटर आणि फोन फेकून द्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com