IND vs PAK: भारत 'पाकिस्तान'सोबत क्रिकेट सामना का खेळतंय? BCCI नं स्पष्ट केली भूमिका

BCCI Secretary Devajit Saikia Explained: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव देवाजित सैकिया यांनी या निर्णयामागचे कारण स्पष्ट केले आहे.
 BCCI Secretary Devajit Saikia Explained
IND vs PAKDainik Gomantak
Published on
Updated on

BCCI Secretary Devajit Saikia ON IND vs PAK: सध्या सुरु असलेल्या आशिया चषक 2025 मध्ये टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध खेळणार असल्याने सोशल मीडियावर टीकेचा भडिमार होत आहे. नुकत्याच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या आणि 'ऑपरेशन सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर देशातील जनमत पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारच्या सामन्याच्या विरोधात असतानाही बीसीसीआयने हा सामना खेळण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मात्र, या वादावर पडदा टाकत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव देवाजित सैकिया यांनी या निर्णयामागचे कारण स्पष्ट केले आहे. हे धोरण केंद्रीय सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित असल्याचे त्यांनी म्हटले.

'आम्ही या स्पर्धेचा बहिष्कार करु शकत नाही'

'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत सैकिया यांनी या निर्णयावर सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले, "आशिया चषक ही एक बहुराष्ट्रीय (Multinational) स्पर्धा असल्यामुळे त्यात भाग घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ही स्पर्धा ऑलिंपिक, फिफा किंवा कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धांसारखीच आहे. त्यामुळे आम्ही या स्पर्धेचा बहिष्कार करु शकत नाही. जर आम्ही असा बहिष्कार केला, तर भविष्यात देशात कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करण्याच्या आमच्या प्रयत्नांवर त्याचा नकारात्मक परिणाम होईल."

 BCCI Secretary Devajit Saikia Explained
Asia Cup 2025: पाकिस्तानविरूध्दच्या सामन्याआधीच टीम इंडियाला तगडा झटका, 'या' स्टार खेळाडूनं सोडली साथ, कारण काय?

'आयसीसी स्पर्धांमध्ये खेळावेच लागते'

सैकिया यांनी द्विपक्षीय (Bilateral) आणि बहुराष्ट्रीय (Multilateral) स्पर्धांमधील फरक स्पष्ट केला. "जर ही द्विपक्षीय मालिका असती, तर आम्ही कोणत्याही शत्रू राष्ट्राविरुद्ध खेळणार नाही असे ठामपणे सांगितले असते," असे ते म्हणाले. "पाकिस्तानचा विचार केल्यास आम्ही 2012-13 पासून त्यांच्यासोबत कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळलो नाही. पण जेव्हा वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत झालेल्या मागील वर्षीच्या टी-20 स्पर्धेसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा असतात, किंवा येणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषक किंवा चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या स्पर्धा असतात, तेव्हा खेळावेच लागते. कारण त्या स्पर्धांमध्ये थेट निर्णय घेण्याचा अधिकार आमच्याकडे नसतो."

बहिष्काराचे गंभीर परिणाम

जर भारताने अशा मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा बहिष्कार केला, तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात, हे देखील सैकिया यांनी स्पष्ट केले. "जर आपण एखाद्या स्पर्धांचा बहिष्कार केला, तर त्या स्पर्धेचे महत्त्व कमी होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, याचा परिणाम भारतीय खेळाडूंच्या करिअरवर होऊ शकतो. जर भारताने एएफसी फुटबॉल स्पर्धा, फिफा पात्रता स्पर्धा, डेव्हिस कप किंवा थॉमस कपमध्ये भाग घेतला नाही, तर भविष्यात जेव्हा आपण 2026 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धा किंवा 2030 मध्ये ऑलिंपिकचे आयोजन करण्याचा विचार करु, तेव्हा हे सर्व घटक भारताच्या विरोधात जाऊ शकतात."

 BCCI Secretary Devajit Saikia Explained
India vs Pakistan: Asia Cup मध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? सामना रद्द करण्याच्या याचिकेवर Supreme Courtनं दिला 'हा' निर्णय

ते पुढे म्हणाले, "जर टीम इंडियाने (Team India) कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भाग न घेण्याचा निर्णय घेतला, तर भारतीय क्रीडा महासंघांवर कारवाई होऊ शकते किंवा त्यांना मोठा दंड होऊ शकतो. हे केवळ क्रिकेटपुरते मर्यादित नाही, तर फुटबॉल, ऍथलेटिक्स, बॉक्सिंग, बॅडमिंटन आणि इतर सर्व खेळांसाठी हे नियम लागू होतात."

केंद्र सरकारच्या धोरणाचे पालन

दरम्यान, या सर्व बाबींचा विचार करून केंद्र सरकारने एक स्पष्ट धोरण आणि मार्गदर्शक तत्त्वे ठरवली आहेत, असे सैकिया यांनी सांगितले. ते म्हणाले, "केंद्रीय सरकारने एक धोरण निश्चित केले आहे. या धोरणानुसार, द्विपक्षीय स्पर्धांमध्ये भारत कोणत्याही शत्रु राष्ट्राविरुद्ध खेळणार नाही. मात्र, बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आम्ही निश्चितच भाग घेऊ. त्यामुळे, आम्ही याच धोरणाचे पालन करत आहोत. हे क्रिकेट, फुटबॉल, ऍथलेटिक्स, बॉक्सिंग, बॅडमिंटन यांसारख्या खेळांसाठी आणि त्यात सहभागी असलेल्या खेळाडूंसाठी आवश्यक आहे. जर केंद्रीय सरकारच्या धोरणानुसार परवानगी असेल, तर आम्हाला हे करावेच लागेल."

 BCCI Secretary Devajit Saikia Explained
Asia Cup 2025: अफगाणिस्तानच्या अजमतुल्ला ओमरझाईचा धमाका; सर्वात जलद 'अर्धशतक' ठोकून मोडला मोठा रेकॉर्ड! VIDEO

एकंदरीत, बीसीसीआयचा (BCCI) हा निर्णय जरी वादग्रस्त वाटत असला, तरी तो आंतरराष्ट्रीय क्रीडा राजकारण, खेळाडूंचे करिअर आणि देशाच्या प्रतिष्ठेशी संबंधित अनेक महत्त्वाच्या बाबींचा विचार करुन घेतला गेला आहे, असे सैकिया यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com