Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं तुफानी शतक ठोकून रचला इतिहास, अनेक दिग्गजांचे विक्रम मोडले

IND VS ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पाचवा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे.
Abhishek Sharma
Abhishek SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पाचवा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या डावात अभिषेक शर्माने शानदार फलंदाजी केली. या सामन्यात अभिषेकने शानदार शतक झळकावले आहे.

त्याने फक्त १७ चेंडूत अर्धशतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याशिवाय, त्याने आपला डाव पुढे नेला आणि शतक ठोकले. तो टी२० मध्ये सर्वात जलद शतक करणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला.

अभिषेक शर्माने इंग्लंडविरुद्ध भारताला चांगली सुरुवात करून दिली. तो सर्वात जलद शतक करणारा दुसरा भारतीय फलंदाज बनला आहे. अभिषेक शर्माच्या खेळीमुळे भारताने पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही केला.

Abhishek Sharma
Goa Folk Dance: ‘प्रदर्शनीय वस्तू’ बनल्यामुळे गोमंतकीय लोकनृत्ये नष्ट होण्याच्या मार्गावर; गोव्यातील नृत्यशैलींबाबत विशेष लेख

दुसरं शतक

या सामन्यात भारताने ६ षटकांत ९५ धावा केल्या. याआधी टीम इंडियाने स्कॉटलंडविरुद्ध ८२ धावा केल्या होत्या. २०२४ मध्ये भारताने बांगलादेशविरुद्ध पॉवरप्लेमध्ये ८२ धावा केल्या होत्या. तर २०१८ मध्ये, टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७८ धावा केल्या होत्या.

अभिषेक आता आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये एकापेक्षा जास्त शतकं करणारा सहावा भारतीय खेळाडू बनला आहे. तो रोहित (५), सूर्यकुमार यादव (४), संजू सॅमसन (३), केएल राहुल (२) आणि तिलक वर्मा (२) यांच्या यादीत सामील झाला आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये अभिषेक भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये शतक करणारा १०वा खेळाडू बनला. त्याने हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध शतक झळकावले.

Abhishek Sharma
Panaji T20 League: रोमहर्षक सामन्यात RC Goa चा विजय, धेंपो चॅलेंजर्सला नमवून प्ले-ऑफ फेरीत पटकावले स्थान

जलद शतक करणारा दुसरा खेळाडू

भारतासाठी सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे, ज्याने श्रीलंकेविरुद्ध (२०१७) ३५ चेंडूत शतक केले होते. रोहितने इंदूरमध्ये ती ऐतिहासिक खेळी खेळली. अभिषेक भारतासाठी सर्वात जलद शतक करणारा दुसरा खेळाडू बनला आहे. अभिषेकने संजू सॅमसनला मागे टाकलं आहे. त्याने बांगलादेशविरुद्ध ४० चेंडूत शतक ठोकलं होतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com