IND vs AUS ODI: कांगारुंची दाणादाण उडवायला टीम इंडिया सज्ज, पहिल्या वनडेत कोणत्या 11 शिलेदारांना मिळणार संधी? गिल-रोहित सलामीला, मग जैस्वालचं काय?

Team India: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन (Playing XI) काय असेल, याबद्दल क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

IND vs AUS ODI: वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका 2-0 ने जिंकल्यानंतर टीम इंडिया आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाली असून त्यांनी पर्थमध्ये आपल्या तयारीला सुरुवात केली आहे. बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये भारतीय खेळाडू तयारीमध्ये व्यस्त असल्याचे दिसत आहेत. या दौऱ्याची सुरुवात 19 ऑक्टोबर रोजी पर्थमध्ये होणाऱ्या पहिल्या वनडे (ODI) सामन्याने होईल.

दरम्यान, या मालिकेतील सर्वात खास गोष्ट म्हणजे शुभमन गिल पहिल्यांदाच भारतीय वनडे संघाचा कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे, तर रोहित शर्मा (Rohit Sharma) हा केवळ खेळाडू म्हणून संघात असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन (Playing XI) काय असेल, याबद्दल क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु आहे.

Team India
IND vs AUS: रोहित, विराट कोहलीचा अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा? पॅट कमिंसने व्यक्त केला अंदाज

सलामीला गिल आणि रोहित

पर्थ वनडेमध्ये भारताच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे झाल्यास, सलामीला कर्णधार शुभमन गिल आणि अनुभवी खेळाडू रोहित शर्मा येतील हे जवळजवळ निश्चित आहे. जर ही जोडी सलामीला आली, तर वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत शतक ठोकणाऱ्या यशस्वी जैस्वालला (Yashasvi Jaiswal) बाहेर बसावे लागू शकते. जैस्वालने उत्कृष्ट फॉर्ममध्ये असूनही वनडे संघात सलामीच्या जागेसाठी गिल आणि रोहित हे अधिक प्रबळ दावेदार आहेत.

अष्टपैलू खेळाडू आणि गोलंदाजी

त्याचवेळी, या संघात ऑलराऊंडर म्हणून नितीश कुमार रेड्डीला संधी मिळण्याची शक्यता आहे. हार्दिक पांड्या या मालिकेचा भाग नसल्यामुळे नितीश कुमार रेड्डी त्याची उणीव भरुन काढू शकेल अशी आशा आहे. दोन फिरकीपटू ऑलराऊंडर म्हणून अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. हे दोन्ही खेळाडू विकेट्स घेण्यासोबतच गरज पडल्यास खालच्या फळीत उपयुक्त धावा करण्याची क्षमता ठेवतात.

Team India
IND U19 vs AUS U19: 18 षटकार, 257 धावा! 14 वर्षीय 'वैभव' सूर्यवंशीचं ऑस्ट्रेलियात वादळ; युथ टेस्ट आणि वनडेत केला मोठा धमाका

तसेच, जलद गोलंदाजी विभागात मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग ही प्रमुख जबाबदारी सांभाळतील. तिसऱ्या जलद गोलंदाजाच्या रुपात प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. अंतिम प्लेइंग इलेव्हन पर्थमधील खेळपट्टी आणि हवामानावर अवलंबून असेल.

Team India
IND vs AUS: 14 वर्षांचा पोरगा बनला षटकारांचा नवा बादशाह! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; तूफानी खेळीनं उडवली कांगांरुची झोप VIDEO

पहिल्या वनडेसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टिरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा.

भारताचा संपूर्ण वनडे संघ: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टिरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), यशस्वी जैस्वाल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com