IND U19 vs AUS U19: 18 षटकार, 257 धावा! 14 वर्षीय 'वैभव' सूर्यवंशीचं ऑस्ट्रेलियात वादळ; युथ टेस्ट आणि वनडेत केला मोठा धमाका

Vaibhav Suryavanshi Record: वैभवने युथ कसोटी मालिकेत दमदार शतकी खेळी केली, तसेच सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत दोन्ही संघांमधील खेळाडूंमध्ये तो पहिल्या क्रमांकावर राहिला.
Vaibhav Suryavanshi Record
Vaibhav SuryavanshiDainik Gomantak
Published on
Updated on

Vaibhav Suryavanshi Reocord: भारतीय अंडर-19 संघाने नुकताच ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यात यजमान संघाविरुद्ध 3 युथ एकदिवसीय (Youth ODIs) आणि 2 युथ कसोटी सामन्यांची (Youth Tests) मालिका खेळली गेली. या संपूर्ण दौऱ्यात पुन्हा एकदा सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष 14 वर्षीय युवा भारतीय फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्या कामगिरीकडे लागले होते. वैभवनेही दोन्ही मालिकांमध्ये आपल्या बॅटने कमाल दाखवत सर्वांना प्रभावित केले. वैभवने युथ कसोटी मालिकेत दमदार शतकी खेळी खेळली, तसेच सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत दोन्ही संघांमधील खेळाडूंमध्ये तो पहिल्या क्रमांकावर राहिला.

वैभवने मारले 18 षटकार, 257 धावा

ऑस्ट्रेलिया (Australia) अंडर-19 संघाविरुद्ध वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने दोन्ही मालिकांमध्ये मिळून एकूण 6 डावांमध्ये फलंदाजी केली आणि सुमारे 42च्या सरासरीने 257 धावा केल्या. विशेष म्हणजे, त्याने या दौऱ्यात एकूण 18 षटकार ठोकले.

Vaibhav Suryavanshi Record
AUS vs PAK, U19 World Cup: वर्ल्ड कप फायनलमध्ये इंडिया-ऑस्ट्रेलिया भिडणार; चांगले खेळूनही पाकिस्तानच्या पदरी निराशा!

युथ वनडे मालिका (3 सामने)

  • वैभवने तीन डावांमध्ये फलंदाजी करताना 41.33 च्या सरासरीने 124 धावा केल्या.

  • त्याच्या फलंदाजीचा स्ट्राइक रेट 112.72 इतका जबरदस्त होता.

  • या मालिकेत त्याने एक अर्धशतक, 12 चौकार आणि 9 षटकार मारले.

युथ कसोटी मालिका (2 सामने):

  • या मालिकेत वैभवने तीन डावांमध्ये फलंदाजी करताना 44.33 च्या सरासरीने एकूण 133 धावा केल्या.

  • यामध्ये त्याच्या बॅटमधून एक शानदार शतकी खेळी पाहायला मिळाली.

  • त्याने 11 चौकार आणि आणखी 9 षटकार लगावले.

अशा प्रकारे दोन्ही मालिका मिळून 6 डावांमध्ये 257 धावा आणि 18 षटकार मारुन त्याने आपल्या क्षमतेची प्रचिती दिली.

Vaibhav Suryavanshi Record
Ind vs SA, U19 World Cup: टीम इंडिया वर्ल्ड कप फायनलमध्ये! द. आफ्रिकेचा उडवला धुव्वा; सचिन-उदय चमकले

आतापर्यंतची एकूण 3 शतके

वैभव सूर्यवंशीचे नाव आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतात तेव्हा चर्चेत आले, जेव्हा त्याने आयपीएल (IPL) 2025 च्या मोसमात राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) खेळताना शतकी खेळी केली. वैभवने आपल्या आतापर्यंतच्या युथ वनडे आणि कसोटी कारकिर्दीत एकूण तीन शतके आणि तीन अर्धशतके झळकावली.

तसेच, आगामी भारतीय घरगुती क्रिकेटचा हंगाम (Domestic Season) वैभवसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. यामध्ये रणजी करंडक (Ranji Trophy) स्पर्धेत तो कशी कामगिरी करतो, याकडे निवड समितीसह (Selectors) सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहील. त्याची ही कामगिरी त्याला लवकरच वरिष्ठ स्तरावर संधी मिळवून देऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com