'Operation Sindoor'नंतर सायबर वॅार; पाकिस्तानकडून 15 लाख हल्ले, भारताच्या 'डिजिटल शिल्ड'ने दिला तगडा प्रतिकार

Pakistan Cyber Attack In India: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतावर तब्बल १५ लाख सायबर हल्ले करण्यात आले आहेत. मात्र भारताच्या मजबूत सायबर सुरक्षा यंत्रणेने त्यामध्ये केवळ १५० हल्ले वगळता उर्वरित सर्व हल्ले निष्फळ ठरवले.
Pakistan Cyber Attack In India
Pakistan Cyber Attack In IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतावर तब्बल १५ लाख सायबर हल्ले करण्यात आले आहेत. मात्र भारताच्या मजबूत सायबर सुरक्षा यंत्रणेने त्यामध्ये केवळ १५० हल्ले वगळता उर्वरित सर्व हल्ले निष्फळ ठरवले. हे हल्ले मुख्यतः पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया, मोरोक्को आणि पश्चिम आशियातील इतर देशांतून करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र सायबर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवारी (१२ मे) दिली.

युद्धबंदीचा नियम असतानाही पाकिस्तानमधील हॅकर्स सातत्याने भारत सरकारच्या महत्त्वाच्या वेबसाइट्स, पोर्टल्स आणि माहितीच्या यंत्रणांना लक्ष्य करत आहेत. त्यांच्या या सायबर हल्ल्यांचा उद्देश माहिती चोरणे, सेवा ठप्प करणे (DDoS हल्ले), आणि खोट्या अफवा पसरवणे असा आहे. या सायबर युद्धामध्ये आता बांगलादेश आणि पश्चिम आशियातील काही गटही सक्रिय झाल्याचे निदर्शनास आले आहे.

Pakistan Cyber Attack In India
Goa Water Crisis: जलसंपदा खाते म्हणते पाणी आहे! मग 'ठणठणाट' का? कोणत्या भागांमध्ये भेडसावते आहे समस्या? जाणून घ्या

भारतीय सायबर सुरक्षा यंत्रणा, विशेषतः महाराष्ट्र सायबर सेल, CERT-In (Computer Emergency Response Team - India) आणि अन्य राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांनी समन्वय साधून या हल्ल्यांवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवले.

हल्ल्यांची माहिती मिळताच अनेक वेबसाइट्सवर त्वरित सुरक्षा अपडेट्स लागू करण्यात आले. काही ठिकाणी वेबसाइट्स तात्पुरत्या बंद ठेवून डेटा संरक्षित करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांपैकी केवळ १५० सायबर हल्ले यशस्वी झाले. मात्र, त्यांच्यामुळे कोणतेही मोठे नुकसान झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

काही हल्ल्यांमध्ये वेबसाइट्सची लूक आणि फील बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर काहींमध्ये वापरकर्त्यांची माहिती चोरीचा उद्देश होता. हे सर्व प्रकार भारतीय यंत्रणांनी तात्काळ नियंत्रणात आणले.

Pakistan Cyber Attack In India
Goa: शेतकऱ्यांसमोर संकट! काजू, आंबा, नारळ उत्पादनात घट; बदलते हवामान, रानटी जनावरे ठरताहेत आव्हान

सायबर विभागाने सर्व शासकीय यंत्रणांना आणि नागरिकांनाही सायबर सुरक्षेबाबत अधिक सावध राहण्याचा इशारा दिला आहे. फिशिंग ईमेल्स, अज्ञात लिंकवर क्लिक करू नका असं सांगण्यात आलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com