
पणजी: राज्यात काजू, आंबा, नारळ आदी बागायती पिकात यंदा मोठी घट दिसून येत आहे. याचा मोठा फटका बागायतदारांबरोबच सर्वसमान्य ग्राहकांनाही बसणार आहे. विशेषत: नारळांचा दर वाढण्याची शक्यता आहे.
गोवा राज्य ज्याप्रमाणे व्यावसायिक क्षेत्रात पुढे जात आहे, त्याप्रमाणे कृषी क्षेत्रातही काही अंशी आता पुढे पाऊल टाकत आहे. फलोत्पादनाकडे देखील शेतकरी वळले आहेत, परंतु परंपरागत काजू, नारळ आणि आंब्याची लागवड असूनही तसेच दरवर्षी क्षेत्रफळात वाढ होऊनही शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही.
काजूला मोहोर चांगला येतो परंतु नंतर हवामान बदलाचा फटका बसतो आणि पिकात घट होते. माडाला नारळ चांगले लागतात, आंब्याचे पीकही चांगले येते परंतु नंतर रानटी जनावरांकडून नासाडी केली जाते. रानटी जनावरे शेतकऱ्यांसाठी आव्हान ठरत असल्याचे विदारक चित्र आहे. याकडे गांभिर्याने लक्ष देत सरकारने काहीतरी उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.
मागील पाच वर्षांचा काजू किंवा इतर पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रफळ आणि उत्पादनाचा आढावा घेतल्यास या पिकांच्या लागवडीखाली येणाऱ्या क्षेत्रफळात हेक्टरांमध्ये वाढ होत आहे, परंतु उत्पादन मात्र सातत्याने घटत आहे, असे दिसून येते. यंदा काजू पीक सरासरी उत्पादनाच्या तुलनेत सद्यःस्थितीत ३० टक्क्यांनी घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नारळ आणि आंब्याची पीक चांगले येते परंतु माकडांद्वारे त्याची नासाडी होत असून त्यांना आळा घालण्यासाठी ठोस उपाय योजने काळाची गरज आहे.
राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत निश्चितपणाने काजू पिकात घट आहे. आंब्याच्या पिकात मागील दोन वर्षांपासून घट होत आहे व नारळ पिकांसाठी खासकरून सत्तरी आणि सांगे भागात खेत्यांचा शेतकऱ्यांना अधिक त्रास आहे. आता एकंदरीत काजू पिकाचा हंगाम संपत आला आहे. यंदा काजू, आंबा, कोकम आदी पिकात घट झाली आहे. काजू पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. आंबे अतिशय पातळ लागले आहेत, त्यामुळे आंबे उतरविण्याचा खर्चही परवडत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.