Indo-US Military Exercise: भारताची चीनला खुन्नस; थेट LAC जवळ अमेरिकेसोबत युद्धसराव

चीनचा जळफळाट; भारताने शांतता कराराचा भंग केल्याचा चीनचा आरोप
indo US
indo USDainik Gomantak

Indo-US Military Exercise: भारत-अमेरिका यांच्यातील संयुक्त युद्धसरावाला उत्तराखंडमध्ये सुरवात झाली आहे. प्रत्यक्ष ताबा रेषा (लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल LAC) पासून जवळ भारत-अमेरिकेचा युद्ध सराव सुरू असून चीनचा त्यामुळे जळफळाट होत आहे. भारताने चीनसोबत केलेल्या सीमा करारांचे हे उल्लंघन आहे, असे चीनने म्हटले आहे.

indo US
Condom found in Students Sack: धक्कादायक! शाळेत विद्यार्थ्यांच्या दप्तरात चक्क कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या, सिगारेट...

चीनने म्हटले आहे की, एलएसीजवळ सुरू असलेल्या भारत-अमेरिका युद्ध सरावाचा चीन विरोध करत आहे. हा युद्धसराव म्हणजे दिल्ली-बीजींग यांच्यातील करारांचे उल्लंघन आहे.

एलएसीपासून जवळपास 100 किलोमीटर अंतरावर भारत-अमेरिकेतील संयुक्त युद्धसराव सुरू आहे. आपत्कालीन मदतकार्य आणि शांतता तसेच दोन्ही देशांच्या सैन्यातील सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने या युद्धसरावाचे आयोजन केले जात आहेत. अमेरिका-भारत या दोन्ही देशांच्या संयुक्त सैन्याने डोंगराळ भागात युद्धसराव केला.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लीजियान म्हणाले की, या युद्धसरावामुळे 1993 आणि 1996 मध्ये चीन आणि भारतात झालेल्या कराराचे हे उल्लंघन आहे.

indo US
Russia-Ukraine War: युद्धात रशियाचे जबर नुकसान; तब्बल 160 हून अधिक कर्नल, जनरलचा मृत्यू

अमेरिकन सैन्याचे अधिकारी ब्रॅडी कॅरोल म्हणाले की, फ्लॅश फ्लड आणि तत्सम स्थितीबाबत आम्ही एक संयुक्त सराव करत आहोत. दोन्ही देशातील सैन्य सहकार्यासाठी आणि संबंध आणखी बळकट होण्यासाठी त्याची मदत होणार आहे. भारतीय लष्कराने 19 नोव्हेंबर रोजी ट्विट करून या सरावाची माहिती दिली होती. औली येथे हा सराव सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com