Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाला 9 महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. पण अजूनही कुणीही माघार घेतलेली नाही. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांना हे युद्ध इतके लांबेल याची कल्पनाही नसेल. युद्ध जितके लांबत चालले आहे तितके ते भीषण होत चालले आहे. या युद्धात रशियाचे जबर नुकसान झाले असून त्यांचे जवळपास 1500 उच्च अधिकाऱ्यांचा युद्धात मृत्यू झाल्याचे समजते.
यात 160 हून अधिक जनरल आणि कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. यापुर्वी अमेरिकेच्या सैन्यातील एका अधिकाऱ्याने दावा केला होता की या युद्धात रशियाचे जवळपास एक लाख सैनिक मारले गेले आहेत.
दरम्यान, या युद्धातील रशियाच्या नुकसानीबाबत रशियाने कोणतीही आकडेवारी जाहीर केलेली नाही. रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोईगू यांनी नुकतेच 5,397 सैनिकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते. पाश्चिमात्य देशांच्या आकडेवारीनुसार हा आकडा रशियाने खूपच कमी सांगितला आहे.
रशियाने युक्रेनच्या खेरसन शहरावरील ताबा सोडला आहे. येथे रशियाला मोठा फटका बसला आहे. येथे दर रात्री किमान 10 रशियन सैनिक मारले जात असल्याची माहिती आहे.
दरम्यान, रशियाच्या या नुकासानीमुळे राष्ट्राध्यक्ष पुतिन हे आता लोकांच्या टीकेचे लक्ष्य बनले आहेत. रशियन सैनिकांच्या माता आणि पत्नींनीही याप्रकरणी प्रश्न उपस्थित केले आहेत. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिलेल्या वचनाची आठवण दिली जात आहे, की त्यांनी दिलेली आश्वासने पुर्ण करण्याची वेळ आली आहे. रशियन सैनिकांनी 14 हजार अमुल्य चित्रांची चोरी केल्याचा आरोप केला जात आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.