IND VS SA: धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका सामना रद्द, चाहत्याचं भंगलं स्वप्न; BCCIवर संताप

IND vs SA 4th T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेतील चौथा सामनाएका विचित्र कारणामुळे रद्द करण्यात आला.
IND VS SA
IND VS SADainik Gomantak
Published on
Updated on

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेतील चौथा सामनाएका विचित्र कारणामुळे रद्द करण्यात आला. लखनौच्या इकाना स्टेडियमवर खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यात खेळाडूंच्या खेळाऐवजी दाट धुक्याचेच वर्चस्व पाहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच धुक्यामुळे एखादा सामना रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे. यामुळे स्टेडियमवर आलेल्या हजारो क्रिकेट चाहत्यांचा मोठा हिरमोड झाला.

नियोजित वेळापत्रकानुसार संध्याकाळी ६:३० वाजता टॉस होणार होता, मात्र मैदानावर इतके दाट धुके होते की एका टोकावरून दुसरे टोक दिसणेही कठीण झाले होते. पंचांनी परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी तब्बल ३ तास प्रतीक्षा केली आणि ६ वेळा खेळपट्टीची पाहणी केली. मात्र, रात्री ९:३० वाजेपर्यंत धुक्याचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच गेले. खेळाडूंच्या सुरक्षेचा विचार करून अखेर अंपायर्सनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

IND VS SA
Goa Nightclub Fire: लुथरा बंधूंना 5 दिवसांची पोलिस कोठडी, विशेष निवास व्यवस्था; झोपण्यासाठी मागितलेल्या गादीची मागणी फेटाळली

तीन पोती गहू विकून आला होता सामना पाहायला!

हा सामना रद्द झाल्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड संताप आणि दुःख पाहायला मिळाले. सोशल मीडियावर बीसीसीआयवर (BCCI) टीकेची झोड उठवण्यात आली. दरम्यान, एका चाहत्याची व्यथा ऐकून सर्वांचे डोळे पाणावले. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना हा चाहता भावूक झाला; त्याने सांगितले की, "मी घराची तीन पोती गहू विकून हा सामना पाहण्यासाठी पैशांची जुळवाजुळव केली होती. पण आता सामनाच झाला नाही, मला माझे पैसे परत हवे आहेत." या चाहत्याचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असून क्रिकेट वेडेपण कोणत्या थराला जाऊ शकते, याची प्रचिती येते.

IND VS SA
Goa Politics: मनोज परब यांच्‍यामुळेच युती झाली नाही! काँग्रेस–फॉरवर्ड युतीला जनता स्‍वीकारणार - माणिकराव ठाकरे

मालिकेत भारत २-१ ने पुढे

सामना रद्द झाल्याचा फायदा भारतीय संघाला झाला आहे. ५ सामन्यांच्या या मालिकेत भारताने आता २-१ अशी अजेय आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता, तर दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. धरमशाला येथील तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाने ७ गडी राखून जोरदार पुनरागमन केले होते. आता मालिकेतील पाचवा आणि शेवटचा निर्णायक सामना १९ डिसेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com