IND vs AUS 3rd ODI: सिडनी वनडेत टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला; विराट कोहलीचा रेकॉर्ड 'फ्लॉप', पण रोहित शर्मा सर्वात यशस्वी फलंदाज!

Virat Kohli and Rohit Sharma ODI Record: सिडनीच्या या निर्णायक सामन्यात टीम इंडियाला आपल्या दोन सर्वात अनुभवी फलंदाजांकडून म्हणजेच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
Virat Kohli and Rohit Sharma ODI Record
Virat Kohli and Rohit Sharma Dainik Gomantak
Published on
Updated on

Virat Kohli and Rohit Sharma ODI Record in Sydney: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना शनिवारी (25 ऑक्टोबर) सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (SCG) खेळला जाईल. पर्थ आणि ॲडलेड येथे झालेले पहिले दोन सामने गमावून टीम इंडियाने ही मालिका आधीच गमावली आहे. त्यामुळे सिडनी वनडे जिंकून किमान आपली प्रतिष्ठा वाचवण्याचा प्रयत्न टीम इंडिया करेल.

सिडनीच्या या निर्णायक सामन्यात टीम इंडियाला आपल्या दोन सर्वात अनुभवी फलंदाजांकडून म्हणजेच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. चला तर मग सिडनीमध्ये या दोन्ही दिग्गजांची आतापर्यंतची कामगिरी कशी राहिली आहे, यावर एक नजर टाकूया.

Virat Kohli and Rohit Sharma ODI Record
IND vs AUS 3rd ODI: शाहिद आफ्रिदीचा 10 वर्ष जुना वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात! 'हिटमॅन' ठरणार वनडेचा सिक्सर किंग; मारावे लागणार फक्त 'इतके' षटकार

विराट कोहलीचा सिडनीतील रेकॉर्ड निराशाजनक

दरम्यान, या मालिकेतील पहिले दोन सामने विराट कोहलीसाठी अत्यंत निराशाजनक ठरले आहेत. दोन्ही वनडे सामन्यांमध्ये विराट शून्यावर बाद झाला. आपल्या 17 वर्षांच्या वनडे कारकिर्दीत विराट कोहली पहिल्यांदाच सलग दोन वेळा शून्यावर बाद झाला आहे. त्यामुळे सिडनी वनडेत तो 'शून्याची ही मालिका' तोडण्यास उत्सुक असेल.

विराटने सिडनीमध्ये आतापर्यंत 7 वनडे सामने खेळले आहेत, पण त्याचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही. विराटची सिडनीतील सरासरी केवळ 24.3 आहे. त्याने 83.0 च्या स्ट्राइक रेटने फक्त 146 धावा केल्या आहेत. विराटने सिडनीमध्ये केवळ एकच अर्धशतक झळकावले असून त्याचा सर्वाधिक स्कोअर 89 आहे. या आकडेवारीवरुन हे स्पष्ट होते की, सिडनीमध्ये विराटचा रेकॉर्ड साधारण आहे. त्यामुळे चाहते त्याच्या कामगिरीबद्दल थोडे चिंतेत आहेत.

Virat Kohli and Rohit Sharma ODI Record
IND vs AUS, 3rd ODI: कोहलीचा 'विराट' रेकॉर्ड! अर्धशतक ठोकून दिग्गजांना सोडले मागे

रोहित शर्माचा रेकॉर्ड शानदार

पर्थमध्ये झालेल्या पहिल्या वनडेत रोहित शर्मा केवळ 8 धावा करुन बाद झाला. पण ॲडलेड येथील दुसऱ्या सामन्यात त्याने अत्यंत कठीण परिस्थितीत 73 धावांची शानदार खेळी खेळली. माजी भारतीय कर्णधाराकडून सिडनीमध्येही टीम इंडिया अशाच एका मोठ्या खेळीची अपेक्षा करत आहे. रोहित शर्माचा सिडनीमध्ये वनडेतील रेकॉर्ड जबरदस्त आहे. 2008 ते 2019 दरम्यान रोहितने सिडनीमध्ये 5 सामन्यांच्या 5 डावांमध्ये 66.60 च्या उत्कृष्ट सरासरीने 333 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. रोहितचा सिडनीतील सर्वाधिक स्कोअर 133 धावा आहे.

Virat Kohli and Rohit Sharma ODI Record
IND vs AUS 3rd ODI: मोठा झटका! 'या' खेळाडूंशिवाय टीम इंडिया तिसरी वनडे खेळणार, कांगारुंना...

सिडनीत खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यांमध्ये रोहित शर्मा हा भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकर 8 सामन्यांत 315 धावांसह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माच्या या दमदार आकडेवारीमुळे भारतीय चाहत्यांना सिडनीमध्ये त्याच्याकडून मोठी धावसंख्या करण्याची आशा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com