IND vs AUS 3rd ODI: मोठा झटका! 'या' खेळाडूंशिवाय टीम इंडिया तिसरी वनडे खेळणार, कांगारुंना...

IND vs AUS 3rd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बुधवारी खेळवला जाणार आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

IND vs AUS 3rd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बुधवारी खेळवला जाणार आहे. राजकोटमध्ये दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.

त्याचवेळी, हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरु होईल. मात्र, तिसऱ्या वनडेपूर्वी मोठी बातमी समोर येत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या व्यतिरिक्त सलामीवीर शुभमन गिल, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल प्लेइंग 11 चा भाग असणार नाहीत.

या खेळाडूंशिवाय मैदानात उतरणार टीम इंडिया...

तथापि, हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि अक्षर पटेल हे मालिकेतील पहिल्या 2 वनडे सामन्यांमध्येही प्लेइंग 11 चा भाग नव्हते. परंतु असे मानले जात होते की, राजकोटमध्ये होणाऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यासाठी हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल प्लेइंग 11 मध्ये परत येऊ शकतात.

मात्र आता, हार्दिक आणि अक्षर यांच्याशिवाय सलामीवीर शुभमन गिल, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर हे तिसरा वनडे सामना खेळणार नाहीत.

इंदूरमध्ये झालेल्या दुसऱ्या वनडेत शुभमन गिलने शानदार शतक झळकावले होते. या सामन्यात गिलने 97 चेंडूत 104 धावांची खेळी खेळली होती, ज्यामध्ये त्याने 6 चौकार आणि 4 षटकार मारले होते.

Team India
IND vs AUS: भारत का ऑस्ट्रेलिया? वर्ल्ड कपमध्ये कोण सरस, 1975 पासूनची आकडेवारी काय सांगते?

मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये होणार

हार्दिक पांड्याशिवाय शुभमन गिल, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल यांची प्लेइंग 11 मध्ये अनुपस्थिती टीम इंडियासाठी मोठा धक्का मानला जात आहे. पण टीम इंडियासाठी चांगली गोष्ट म्हणजे 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

तिसर्‍या सामन्यात टीम इंडिया (Team India) पराभूत झाली तरी केएल राहुलच्या नेतृत्वाखाली मालिका जिंकली आहे. मोहालीमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 5 गडी राखून पराभव केला. यानंतर इंदूरमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 99 धावांनी पराभव केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com