चिकनगुनियाविरुद्धच्या लढ्यात 'गोमूत्र अर्क' ठरणार रामबाण उपाय? संशोधनात मोठे यश

IIT Roorkee Chikungunya Virus Study: उत्तराखंडमधील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी रुडकी) येथील संशोधकांनी प्रयोगशाळेत एक आशादायक यश मिळवले.
iit roorkee study cow urine distillate chikungunya virus ayurveda research
IIT Roorkee Chikungunya Virus StudyDainik Gomantak
Published on
Updated on

IIT Roorkee Chikungunya Virus Study: भारतात चिकनगुनियासारख्या आजारांचा प्रादुर्भाव सातत्याने चिंतेचा विषय ठरत आहे. सद्यस्थितीला चिकनगुनियावर कोणतेही ठोस अँटीव्हायरल औषध उपलब्ध नाही. यामुळेच आधुनिक विज्ञानाच्या मदतीने पारंपरिक उपचार पद्धतींमध्ये यावर काही उपाय सापडतो का, याचा शोध शास्त्रज्ञ घेत आहेत.

याचदरम्यान, उत्तराखंडमधील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी रुडकी) येथील संशोधकांनी प्रयोगशाळेत एक आशादायक यश मिळवले. त्यांच्या नवीन अभ्यासानुसार, पारंपरिक आयुर्वेदिक गोमूत्र अर्कामध्ये चिकनगुनियाच्या विषाणूविरुद्ध लढण्याची मजबूत क्षमता असल्याचे प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये दिसून आले.

iit roorkee study cow urine distillate chikungunya virus ayurveda research
PM Modi Record: पंतप्रधान मोदींचा 'लकी 10 जून'! इंदिरा गांधींनंतर आता पंडित नेहरुंनाही टाकणार मागे; काय आहे 'तो' अद्भूत रेकॉर्ड?

आयआयटी रुडकीच्या बायोसायन्सेस आणि बायोइंजिनिअरिंग विभागाच्या प्राध्यापक शैली तोमर आणि त्यांच्या संशोधन पथकाने हे महत्त्वपूर्ण संशोधन केले. प्रयोगशाळेत केलेल्या नियंत्रित प्रयोगांदरम्यान असे दिसून आले की, गोमूत्र अर्काच्या वापरामुळे चिकनगुनियाच्या विषाणूचे प्रमाण तब्बल 90 टक्क्यांहून अधिक कमी झाले. इतकेच नव्हे तर, या अर्कातील नैसर्गिक घटकांचा वापर करुन तयार करण्यात आलेल्या एका विशेष मिश्रणाने हा व्हायरल लोड तब्बल 99.85 टक्क्यांपर्यंत यशस्वीरीत्या कमी केला.

iit roorkee study cow urine distillate chikungunya virus ayurveda research
PM Modi UAE Visit 2026: "होर्मुजची कोंडी फुटणे ही आमची प्राथमिकता'' पीएम मोदींचा युएईच्या भूमीवरुन जगाला शांततेचा संदेश

या संशोधनादरम्यान शास्त्रज्ञांनी गोमूत्र अर्कामध्ये असलेल्या अशा अनेक विशिष्ट घटकांची ओळख पटवली, जे या विषाणूचा नायनाट करण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. हे संशोधन 'एसीएस ॲग्रीकल्चरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी' या नामांकित आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले.

iit roorkee study cow urine distillate chikungunya virus ayurveda research
PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

चिकनगुनिया हा संसर्गित एडिस डासांच्या चावण्यामुळे होणारा आजार आहे. यामध्ये रुग्णाला तीव्र ताप, सांधेदुखी, डोकेदुखी, स्नायू दुखणे आणि प्रचंड थकवा जाणवतो. अनेकांना यातील सांधेदुखीचा त्रास कित्येक महिने सहन करावा लागतो. सध्या केवळ ताप आणि वेदना कमी करण्यासाठीच उपचार केले जातात. त्यामुळेच नैसर्गिक घटकांपासून अँटीव्हायरल औषध विकसित करणे अत्यंत गरजेचे बनले. आयआयटी रुडकीच्या टीमने दाखवून दिले की, पारंपरिक आयुर्वेदिक ज्ञानाची आधुनिक बायोटेक्नॉलॉजीच्या साहाय्याने पडताळणी केली जाऊ शकते. केवळ जुन्या दाव्यांवर अवलंबून न राहता, शास्त्रज्ञांनी त्यातील रासायनिक रचनेचा सखोल अभ्यास केला.

iit roorkee study cow urine distillate chikungunya virus ayurveda research
PM Modi Srisailam Visit: आंध्रात शिवरायांसमोर पंतप्रधान मोदी नतमस्तक; श्रीशैलम येथे श्री शिवाजी ध्यान मंदिर अन् शिवाजी दरबार हॉलला दिली भेट पाहा Photo

तथापि, हे परिणाम प्राथमिक असून नागरिकांनी चिकनगुनियाच्या उपचारासाठी थेट गोमूत्र पिणे किंवा वापरणे पूर्णपणे टाळावे, असा कडक इशारा संशोधकांनी दिला. हे सर्व प्रयोग केवळ प्रयोगशाळेतील नियंत्रित वातावरणात झाले असून अद्याप मानवावर किंवा प्राण्यांवर याच्या चाचण्या झालेल्या नाहीत. त्याची सुरक्षा आणि परिणामकारकता सिद्ध होण्यासाठी अजून मोठ्या प्रमाणावर संशोधनाची गरज आहे. त्यामुळे चिकनगुनियाची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घेणे, भरपूर पाणी पिणे आणि विश्रांती घेणे आवश्यक आहे.

iit roorkee study cow urine distillate chikungunya virus ayurveda research
PM Modi Song: एक कर्मयोगी जो... मोदींवर आलं मराठी गाणं; अजय-अतुलनं दिलं संगीत; प्रमोद सावंतांनी शेअर केला व्हिडिओ Watch Video

भविष्यात जर या चाचण्या यशस्वी ठरल्या, तर पारंपरिक आयुर्वेदाच्या प्रेरणेतून आणि आधुनिक विज्ञानाच्या पाठबळावर चिकनगुनियावर जगातील पहिले प्रभावी औषध तयार होऊ शकते, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com