लग्नाचे आश्वासन, शारीरिक संबंध आणि कुटुंबाची सहमती... बलात्काराच्या आरोपातून तरूणाची अशी झाली मुक्तता

Promise Of Marriage: "संबंधित महिलेशी लग्न करण्याची माझी मनापासून ईच्छा आणि प्रयत्न होते, परंतु तिने हा प्रस्ताव फेटाळून लावला आणि आपण दुसऱ्याशी लग्न करणार असल्याचे सांगितले."
Nagpur Bench Of Mumbai High Court
Nagpur Bench Of Mumbai High CourtDainik Gomantak
Published on
Updated on

If a man breaks his promise to marry a woman due to lack of family consent, it does not constitute the crime of rape, said the Nagpur bench of the Bombay High Court:

कुटुंबाची सहमती नसल्यामुळे जर एखाद्या पुरुषाने एखाद्या महिलेशी लग्न करण्याचे वचन मोडले तर तो बलात्काराचा गुन्हा घडत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने म्हटले आहे. उच्च न्यायालयाने 31 वर्षीय व्यक्तीच्या विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करताना ही टिप्पणी केली. लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

न्यायमूर्ती एम डब्ल्यू चंदवानी यांच्या एकल खंडपीठाने 30 जानेवारी रोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, "आरोपीने केवळ लग्नाचे वचन मोडले आहे. त्याने महिलेला तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी लग्नाचे वचन दिले नाव्हते. आश्वासन मोडणे आणि खोटे आश्वासन न पाळणे यात फरक आहे.”

Nagpur Bench Of Mumbai High Court
'तुला स्वयंपाकही करता येत नाही', एका टोमण्यासाठी पत्नीने मागितला थेट घटस्फोट; वाचा काय म्हणाले हायकोर्ट

2019 मध्ये, 33 वर्षीय महिलेने नागपूर पोलिसांसमोर दाखल केलेल्या एफआयआरमध्ये दावा केला होता की, ती 2016 पासून त्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि त्याने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. या व्यक्तीचे दुसऱ्याशी लग्न झाल्याचे समजल्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.

Nagpur Bench Of Mumbai High Court
Butter Chicken आणि Dal Makhani चे जन्मदाते कोण? हायकोर्ट करणार तपासणी

या खटल्यातून मुक्तता करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेत आरोपीने सांगितले की, संबंधित महिलेशी लग्न करण्याची माझी मनापासून ईच्छा आणि प्रयत्न होते, परंतु तिने हा प्रस्ताव फेटाळून लावला आणि आपण दुसऱ्याशी लग्न करणार असल्याचे सांगितले.

याचिकेत म्हटले आहे की, पुरुषाच्या कुटुंबानेही हे नाते स्वीकारण्यास नकार दिला होता, त्यानंतर तो दुसऱ्या महिलेशी लग्न करण्यास तयार झाला. त्यात म्हटले आहे की, तक्रारदाराने २०२१ मध्ये दुसरे लग्न केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com