'You can't even cook', wife demand divorce for a taunt from husband; Read what the Bombay High Court said:
मुंबई उच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान सांगितले की, 'स्वयंपाक करता येत नाही' यावर केलेली टिप्पणी आयपीसीच्या कलम 498A अंतर्गत क्रूरतेचे प्रमाण नाही.
खरं तर, एका महिलेने तिच्या पतीच्या नातेवाईकांविरोधात क्रूरतेचा आरोप करत एफआयआर दाखल केला होता. हा एफआयआरही न्यायालयाने फेटाळला.
महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, तिच्या मेव्हण्यासह सासरचे लोक तिला टोमणे मारत असत. 'तिला स्वयंपाक कसा करायचा हे सुद्धा कळत नाही' असे म्हणत ते टोमणे मारायचे. तसेच आई-वडिलांनी मला काहीही शिकवले नाही असे म्हणायचे.
या महिलेचे जुलै 2020 मध्ये लग्न झाले होते आणि तिने जानेवारी 2021 मध्ये तक्रार केली होती की, तिचा पती लग्नानंतर शारिरीक संबंध ठेऊ शकत नव्हता आणि यावर सासरचे लोक महिलेची टिंगल करायये, असे तक्रारीत म्हटले आहे.
उच्च न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी करताना म्हटले आहे की, आयपीसी कलम 498A अंतर्गत लहान-मोठे वाद ही क्रूरता नाही.
प्रथमदर्शनी महिलेला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले गेले असेल किंवा गंभीर दुखापत केली असेल किंवा हुंड्यासाठी छळ झाला असेल तेव्हाच असा गुन्हा सिद्ध होतो, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, “याचिकाकर्त्यांवर एकच आरोप आहे की, त्याने टिप्पणी केली होती की, तक्रारदाराला स्वयंपाक कसा करायचा हे माहित नाही. आणि आयपीसीच्या कलम ४९८अ अन्वये अशा प्रकारची टिप्पणी क्रौर्य मानली जात नाही.''
या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई आणि न्यायमूर्ती नितीन आर बोरकर यांच्या खंडपीठाने यासोबतच संबंधितांची याचिका मान्य करत एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.