NitishKumar On BJP: मरेन पण पुन्हा भाजपसोबत जाणार नाही... नितीशकुमार यांचे मत

यापुर्वीही अशी घोषणा केली होती मग युती का केली, भाजपचा सवाल
Nitish Kumar
Nitish KumarDainik Gomantak
Published on
Updated on

NitishKumar On BJP: भाजपमध्ये येण्याच्या प्रश्नावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी, मी मरेन, पण भाजपसोबत जाणार नाही, असे वक्तव्य केले आहे. माझ्यासोबत सरकारमध्ये असताना लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांना गोवण्याचे काम भाजपने केले, असा आरोपही नितीशकुमार यांनी केला.

Nitish Kumar
UGC New Guidelines: आता विद्यापीठातील विद्यार्थीच बनणार शिक्षक; 5 निरक्षरांना शिकवणे सक्तीचे...

आता तेजस्वी आमच्यासोबत आहे, पण त्यांना हटवण्यासाठी भाजप पुन्हा त्यांना अडकवण्याचे काम करत आहे. भाजप आता जुना भाजप राहिलेला नाही. भाजपच्या नेत्यांनी एक नवा भाजप बनवला केला आहे. भाजपचे जुने नेतेही हेच सांगतील.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राज्यपाल फागू चौहान पाटण्यातील गांधी घाटावर आले होते. तेव्हा प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

नितीशकुमार म्हणाले, बापू सर्वांचे संरक्षण करत होते. सर्वांना सोबत घेऊन जात होते. त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली. हे कुणीही विसरू नका. काही लोक हे विसरवायचा प्रयत्न करती. भांडणे लावतील. पण त्यांना भुलू नका. आम्हाला मरण मान्य आहे, पण त्यांच्यासोबत जाणं मान्य नाही. अल्पसंख्याकांचीही मते आम्हाला मिळाली होती पण याचा भाजपला विसर पडला. आम्ही अटल-अडवाणींच्या बाजूने होतो, आता जे लोक आले आहेत. ते सर्व काही बदलत आहे. नावे बदलत आहेत.

Nitish Kumar
Sweden Girl Marriage: स्वीडनच्या मुलीची वरात थेट उत्तरप्रदेशच्या गावात! फेसबूकवरून जुळले प्रेम...

ते म्हणाले की, 2020 च्या निवडणुकीत मला बळजबरीने मुख्यमंत्री बनवले गेले, मला व्हायचे नव्हते. माझ्या पक्षातील प्रत्येकजण म्हणत होता की त्यांनीच आम्हाला हरवले. भाजपच्या लोकांनी आमच्या मतांमुळे ते जिंकल्या.

ते बिहारमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि शिवसेना या पक्षांना लढायला लावायचे. धनुष्यबाण हे या पक्षांचे चिन्ह होते, त्यामुळे आमचे मतदार गोंधळून जायचे. त्यामुळे आमचे 5-7 लोक निवडणूक हरायचे. 2015 मध्ये युती नसताना किती जागा मिळाल्या.

दरम्यान, नितीशकुमार यांना भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. मातीत मिसळून जाईन पण भाजपसोबत जाणार नाही, असे म्हणत होतात. मग तरीही तुम्ही भाजपशी युती का केली? असा सवाल भाजप नेते आणि बिहार विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते सम्राट चौधरी यांनी केला आहे.

नितीश कुमार जी, भाजपने तुम्हाला बापासमान मानून खांद्यावर बसवून मुख्यमंत्री केले. आता तुम्हा ज्यांच्या खांद्यावर आहात, त्यांनाही भाजपनेच बनवले होते. 2024 मध्ये तुम्हाला एकही जागा मिळणार नाही, असे चौधरी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com