केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) रविवारी 10 नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत, त्याचे अध्यक्ष स्वत: गृहमंत्री असतील. या दरम्यान, सद्य परिस्थितीचा आढावा घेण्याबरोबरच सुरक्षा आणि विकासाशी संबंधित समस्यांसाठी भविष्यातील कृती आराखड्यावर चर्चा केली जाईल. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 नक्षलग्रस्त राज्यांमध्ये नवीन रणनिती लागू करण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
विज्ञान भवनात होणाऱ्या या बैठकीत छत्तीसगड, झारखंड, बिहार, ओडिशा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, बंगाल, उत्तर प्रदेश, केरळ आणि मध्य प्रदेश या सर्व 10 नक्षलग्रस्त राज्यांचे मुख्यमंत्री किंवा त्यांचे प्रतिनिधी सहभागी होतील. या दरम्यान, मुख्यमंत्री त्यांना त्यांच्या राज्यांची सद्यस्थिती आणि विकास प्रकल्पांमधील प्रगतीबद्दल माहिती देतील. मुख्यमंत्री किंवा त्यांचे प्रतिनिधी नक्षलवादाला सामोरे जाण्यासाठी त्यांच्या राज्य प्रशासनाने आतापर्यंत घेतलेल्या पावलांची माहिती देखील गृहमंत्र्यांना सांगतील.
सूत्रांच्या माहितीनुसार, अशा बैठका वर्षातून एकदा किंवा दोनदा गरजेनुसार आयोजित केल्या जातात. परंतु कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी ही बैठक होऊ शकली नाही. या दहा राज्यांचे पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिवांव्यतिरिक्त निमलष्करी दलांचे प्रमुखही या बैठकीत सहभागी होतील. इंटेलिजन्स ब्युरो या दरम्यान नक्षलवादी हिंसाचारावर सादरीकरण देण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला, गुप्तचर ब्युरोचे संचालक अरविंद कुमार आणि गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.