देशात उष्णतेची लाट, 40 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान

उष्णतेची लाट आणि उष्ण वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे
Heat wave in the country, temperatures above 40 degrees Celsius
Heat wave in the country, temperatures above 40 degrees CelsiusDainik Gomantak

उत्तर भारतातील बहुतांश राज्ये उष्णतेच्या लाटेच्या तडाख्यात आहेत. एप्रिलचा पहिला आठवडा सुरू असून रणरणत्या उन्हामुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, उत्तर-पश्चिम भाग आणि मध्य भारतात पुढील पाच दिवस उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. या राज्यांमध्ये उष्णतेची लाट किंवा उष्ण वारे वाहण्याची शक्यता हवामान (Weather) खात्याने व्यक्त केली आहे.

या भागात उष्णतेची लाट राहील IMD नुसार, पुढील 5 दिवसांत राजस्थान, उत्तर प्रदेश, दक्षिण पंजाब, दक्षिण हरियाणा-दिल्ली, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

Heat wave in the country, temperatures above 40 degrees Celsius
'रिमांड होममध्ये मुलींचे लैंगिक शोषण', ऑडिओ व्हायरल

याशिवाय पुढील 3 दिवस गुजरातच्या उत्तरेकडील भागात उष्णता राहील. दुसरीकडे, हिमाचल प्रदेश, विदर्भ, बिहारचा काही भाग आणि जम्मू प्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

राजस्थानच्या (Rajasthan) अलवरमध्ये आज कमाल तापमान (temperature) 45.8 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) ने म्हटले आहे. गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीतील इतर अनेक शहरांमध्ये 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान नोंदवले गेले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com