'रिमांड होममध्ये मुलींचे लैंगिक शोषण', ऑडिओ व्हायरल

चौकीदार आणि मुलाने मुलीचे केले अपहरण
sho made lewd remarks on remand home audio went viral
sho made lewd remarks on remand home audio went viralDainik Gomantak
Published on
Updated on

बिहारमधील रिमांड होमचे सत्य कोणाला माहीत नाही. पण हे सत्य पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले तर त्याचे गांभीर्य समजू शकते. बेतियामध्ये पोलिसांनी आरोपीच्या कुटुंबीयांना रिमांड होमची सत्यता सांगून धमकावले. ज्याचा ऑडिओ व्हायरल (Viral) झाला होता. यानंतर बेतियाच्या एसपींनी आरोपी एसएचओला निलंबित केले.

खरे तर हे संपूर्ण प्रकरण बेतियाच्या बैरिया पोलीस (Police) ठाण्याचे आहे. पोलीस ठाण्याचे चौकीदार शंभू साह आणि त्याच्या मुलावर सुदामा नगर गावातील एका मुलीला पळवून नेल्याचा आरोप आहे. मुलीचे कुटुंबीय पोलिस ठाण्यात तक्रार घेऊन गेले असता, कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी एसपींना भेटण्याचा निर्णय घेतला.

sho made lewd remarks on remand home audio went viral
भारत-पाकिस्तानच्या 'या' प्रश्नावर लवकरच निर्णय, अधिकाऱ्यांची दुबईत बैठक

एसपींची भेट घेतल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांकडून अर्ज घेण्यात आला. अपहरणानंतर 12 दिवसांनी पोलिसांनी मुलीचा शोध घेतला. चौकीदार आणि त्याच्या मुलाला वाचवण्यासाठी ठाणेदाराने पीडित मुलीच्या कुटुंबासमोर रिमांड होममध्ये मुलींवर लैंगिक अत्याचार (Sexual harassment) झाल्याची चर्चा सुरू केली. पीडित कुटुंबीयांनी ठाणेदार दुष्यंत सिंह यांची ही संपूर्ण गोष्ट रेकॉर्ड केली आणि सोशल मीडियावर व्हायरल केली.

पीडित मुलीचा भाऊ अजय पासवानने सांगितले की, पोलिस स्टेशनचा चौकीदार आणि मुलाने माझ्या बहिणीचे अपहरण केले. पोलिसांनी 12 दिवसांनी बहिणीला आणले. एसएचओ अर्ज घेत नव्हते. एसपींच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलीस कर्मचारी रिमांड होमचे सत्य तुम्हाला माहीत नाही, असे सांगू लागले, तिथे पुढारी लोकांची वाहने येतात आणि मुलीला त्यात घेऊन जातात. उपेंद्र नाथ वर्मा (एसपी, बेतिया) म्हणाले की, या शिस्तभंगामुळे एसएचओला निलंबित करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Dharmendra Pradhan Reaction
Bihar Police AK47 Firing On Students Video
CJP Protest Violence Pakistan Social Media Connection
Constitutional right to protest India
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com