Brij Bhushan Sharan Singh: 1971 मध्ये मोदी पंतप्रधान असते पाक-चीनकडून हिसकावली असती जमीन; ब्रिजभूषण यांचा दावा

Pakistan China: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रीजभूषण सिंह यांच्याविरुद्ध देशातील दिग्गज महिला कुस्तीपटूंनी मोर्चा खोलला आहे.
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra ModiDainik Gomantak

Pakistan China: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रीजभूषण सिंह यांच्याविरुद्ध देशातील दिग्गज महिला कुस्तीपटूंनी मोर्चा खोलला आहे.

यातच, कैसरगंज येथील भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांनी रविवारी सांगितले की, 'नरेंद्र मोदी 1971 मध्ये पंतप्रधान असते तर 1947 मध्ये पाकिस्तानने आणि 1962 मध्ये चीनने बळकावलेली जमीन परत मिळवली असती.'

केंद्रातील मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बाळापूर येथे आयोजित एका जाहीर सभेत सिंह बोलत होते. जरी त्यांनी आपल्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांबद्दल कोणत्याही स्वरुपाचे वक्तव्य केले नाही.

सिंह म्हणाले की, '1947 मध्ये काँग्रेसची (Congress) सत्ता असताना या देशाची फाळणी झाली, त्याची जखम अजून भरलेली नाही. काँग्रेसची सत्ता असताना 78 हजार चौरस किलोमीटर जमीन पाकिस्तानने बळकावली होती. 1962 मध्ये काँग्रेसची सत्ता असतानाच चीनने आपल्यावर हल्ला करुन 33 हजार चौरस किलोमीटर जमीन बळकावली.'

Prime Minister Narendra Modi
Karnataka High Court: नवऱ्यावर बलात्काराचा आरोप, कर्नाटक HC म्हणाले, 'कायद्याच्या दुरुपयोगाचे यापेक्षा चांगले उदाहरण...'

सिंह पुढे म्हणाले की, “1971 मध्ये एका अभूतपूर्व घटनेत 92,000 पाकिस्तानी सैनिकांना भारतीय लष्करापुढे शरणागती पत्करली होती, परंतु तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जुने स्कोअर सेट न करता त्यांची सुटका केली.

मोदींसारखा पंतप्रधान असता तर ताब्यात घेतलेली जमीन पुन्हा मिळवली असती.'' 1975 मध्ये देशात आणीबाणी लागू केल्याबद्दल त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. 1984 च्या शीखविरोधी दंगलीत काँग्रेसने शीखांची हत्या केल्याचा आरोपही यावेळी सिंह यांनी केला.

दरम्यान, शनिवारी, आंदोलक कुस्तीपटूंनी आरोप केला की, सिंह लैंगिक अत्याचार पीडितांवर दबाव आणण्यासाठी आणि त्यांना त्यांचे जबाब बदलण्यास भाग पाडण्यासाठी आपल्या प्रभावाचा वापर करत आहेत.

15 जूनपर्यंत सिंह यांच्यावर निर्णायक कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन सुरु करण्याचा इशारा त्यांनी दिला. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या आश्वासनानुसार या प्रकरणात 200 हून अधिक लोकांचे जबाब घेतलेले दिल्ली पोलीस 15 जूनपर्यंत आरोपपत्र दाखल करेल.

Prime Minister Narendra Modi
Brij Bhushan Sharan Singh : हा तर इमोशनल ड्रामा; ब्रिजभूषण सिंग यांचे कुस्तीपटूंबद्दल वादग्रस्त विधान

दुसरीकडे, रविवारी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर स्तुतीसमुनांचा वर्षाव करताना सिंह म्हणाले की, “सुरुवातीला आम्ही मुखर्जींनी ज्या ठिकाणी बलिदान दिले ते काश्मीर आमचे आहे, अशी मागणी करत होतो.

आम्ही आजही अभिमानाने याची पुनरावृत्ती करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यामुळे हे शक्य झाले आहे.''

तसेच, काँग्रेसवर हल्लाबोल करताना भाजप खासदार सिंह म्हणाले की, 'राम मंदिराचा निर्णय वेळेवर होऊ नये म्हणून काँग्रेसने वकीलांची फौज उभी केली होती.

त्याचबरोबर, एका दोषी दहशतवाद्याला फाशीच्या शिक्षेपासून वाचवण्यासाठी मध्यरात्री सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडले गेले.'

ते पुढे असेही म्हणाले की, 'काँग्रेस भारतीय लष्कराच्या शौर्याचा पुरावा मागत आहे. शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या कोरोनाविरोधी लसीवरही कॉंग्रेसकडून प्रश्न उपस्थित केले.'

Prime Minister Narendra Modi
Brij Bhushan Singh: कुस्ती महासंघांच्या अध्यक्षांविरोधात दिग्गज कुस्तीपटू जंतरमंतरवर, लैंगिक शोषणाचा आरोप

सिंह म्हणाले की, '1984 नंतर अल्पमतातील सरकारे स्थापन झाल्यामुळे भारतात पुन्हा कधी पूर्ण बहुमताचे सरकार येणार नाही अशी चर्चा सुरु झाली होती, परंतु 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन झाले.

विशेष म्हणजे, 2019 मध्ये पुन्हा सरकार आले. आता, 2024 मध्येही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा सत्तेत येईल.'

सिंह शेवटी म्हणाले की, 'आज अयोध्या (Ayodhya) आणि काशीमध्ये केवळ मंदिरेच बांधली जात नाहीत, तर रस्ते, वैद्यकीय महाविद्यालये आणि विद्यापीठेही बांधली जात आहेत.'

विशेष म्हणजे, 2 जून रोजी अयोध्येच्या जिल्हा प्रशासनाने लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी ब्रिजभूषण शरण सिंह यांना 5 जून रोजी रॅली काढण्यास परवानगी नाकारली होती.

मात्र, कुस्तीपटूंच्या आरोपांची चौकशी सुरु असल्याने राम कथा पार्क येथे होणारी जन चेतना महारॅली काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आल्याचे सिंह म्हणाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com