Gujarat Riots: तिस्ता सेटलवाड प्रकरणाची SIT करणार चौकशी

अहमदाबाद क्राइम ब्रँचमध्ये तिस्ता सेटलवाड यांच्या विरोधात दाखल केलेल्या एफआयआर संदर्भात गुजरात ATSने मुंबईतून ताब्यात घेतले.
SIT Formed In Teesta Setalvad Case
SIT Formed In Teesta Setalvad CaseTwitter
Published on
Updated on

SIT Formed In Teesta Setalvad Case: तिस्ता सेटलवाड प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आली आहे. ही चार सदस्यीय एसआयटी गुजरात पोलिसांनी स्थापन केली होती, जी आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 आयपीएस अधिकारी एसआयटीमध्ये या प्रकरणाची चौकशी करतील. एसआयटीमध्ये एसओजीचे एसीपी बीसी सोलंकी यांचाही समावेश आहे. याशिवाय डीसीपी चैतन्य मंडलिक, एटीएस डीआयजी दीपन भद्रन आणि एटीएस एसपी सुनील जोशी यांचाही एसआयटीमध्ये समावेश आहे.

SIT Formed In Teesta Setalvad Case
अग्निवीरांना रेल्वे स्थानकांवर मिळणार काम, केंद्र सरकारच्या शिक्कामोर्तबाची प्रतीक्षा

अहमदाबाद क्राइम ब्रँचमध्ये तिस्ता सेटलवाड यांच्या विरोधात दाखल केलेल्या एफआयआर संदर्भात गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) शनिवारी मुंबईतून त्यांना ताब्यात घेतले. तिस्ता सेटलवाड यांची अटक त्यांच्या एनजीओशी संबंधित आहे, ज्यांनी कायदेशीर लढाईत झाकिया जाफरी यांना पाठिंबा दिला होता.

गुजरात दंगलीशी संबंधित प्रकरण

जाफरी यांचे पती एहसान जाफरी, जे काँग्रेसचे नेते होते, 2002 च्या गुजरात दंगलीत मारले गेले होते. सुप्रीम कोर्टाने झाकिया जाफरी यांची याचिका फेटाळून लावत गुजरात दंगलीवरील निकाल कायम ठेवल्याने हे प्रकरण पुन्हा तापले आहे. 2022 च्या गुजरात दंगलीप्रकरणी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना दिलेली क्लीन चिट शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली.

SIT Formed In Teesta Setalvad Case
आप'ला धक्का, संगरूर लोकसभा मतदारसंघातून सिमरनजीत सिंह मान विजयी

न्यायालयाने सीतलवाड यांचा उल्लेख केला होता

झाकिया जाफरी यांच्या अर्जात योग्यता नसल्याचे न्यायालयाने म्हटले होते. न्यायालयाने एसआयटीचा अहवाल स्वीकारण्याचा गुजरात दंडाधिकाऱ्यांचा 2012चा आदेश कायम ठेवला होता. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, या खटल्यात सह याचिकाकर्ते सीतलवाड यांनी झाकिया जाफरी यांच्या भावनांचा गैरवापर केला. न्यायालयाच्या निर्णयानंतर अहमदाबाद क्राइम ब्रँचने तिस्ता सेटलवाड, माजी आयपीएस संजीव भट्ट आणि माजी आयपीएस आरबी श्रीकुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तीस्ता आणि श्रीकुमार यांना ताब्यात घेण्यात आले तर संजीव भट्ट आधीच तुरुंगात आहेत. माजी आयपीएस आरबी श्रीकुमार यांना गांधीनगर येथून ताब्यात घेण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com