अग्निवीरांना रेल्वे स्थानकांवर मिळणार काम, केंद्र सरकारच्या शिक्कामोर्तबाची प्रतीक्षा

केंद्र सरकार अग्निपथ योजनेमध्ये अनेक सुविधांचा समावेश करत आहे.
Agniveer Yojana
Agniveer YojanaDainik Gomantak
Published on
Updated on

केंद्र सरकार (Central Government) अग्निपथ योजनेमध्ये अनेक सुविधांचा समावेश करत आहे. याअंतर्गत अग्निवीरांना त्यांच्या (Agniveer Yojana) सेवानिवृत्तीनंतर रेल्वे स्थानकांवर केटरिंग आणि बहुउद्देशीय स्टॉल्स देण्याबाबत विचार करण्यात येत आहे. (Agniveer will get jobs at railway stations after 4 years Government big Announcement)

Agniveer Yojana
त्रिपुराच्या 3 विधानसभा जागांवर फुलले कमळ, काँग्रेसला 1 जागेवर मानावे लागले समाधान

रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सरकारच्या धोरणानुसार यावर्षी 40 हजार अग्निवीरांची भरती करण्यात येणार आहे. यातील 25 टक्के अग्निवीरांना सैन्यात ठेवण्यात येणार असून उर्वरित 30 हजारांना चार वर्षांनी निवृत्त करण्यात येणार आहे.

रेल्वे मंत्रालय चार वर्षांनंतर निवृत्त होणाऱ्या अग्निवीरांना रेल्वे स्थानकांवर स्टॉल देण्याचा प्रस्तावाचा विचार करत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांना हमखास रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्रस्तावावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर धोरण तयार करण्याचे काम सुरू केले जाईल.

Agniveer Yojana
मिझोरामच्या 'चिते लुई' नदीचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले, हे कसे घडले

एक स्टेशन, एक उत्पादन योजनेअंतर्गत

वाटप करणाऱ्यांनी माहिती दिली की अग्निवीरांना एक स्टेशन, एक उत्पादन योजनेअंतर्गत स्टॉल्स व्यतिरिक्त केटरिंग स्टॉल, बहुउद्देशीय स्टॉल्सचे वाटप केले जाणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या महिन्यात एक स्टेशन, एक उत्पादन धोरण लागू केले होते तसेच या अंतर्गत प्रत्येक शहराच्या स्थानिक लोकप्रिय उत्पादनाची विक्री करण्यासाठी प्रत्येक प्लॅटफॉर्मवर किमान दोन कायमस्वरूपी स्टॉल उघडले जाणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com