शिरोमणी अकाली दलाचे (अमृतसर) सिमरनजीत सिंग मान यांनी येथून निवडणूक जिंकली आहेत. सिमरनजीत सिंह मान (Simranjit Singh Mann) हे देखील आयपीएस अधिकारी राहिले आहेत. सिमरनजीत मान 1989 मध्ये तरनतारन आणि 1999 मध्ये संगरूरमधून खासदार राहिले आहेत. त्यांनी आतापर्यंत 6 वेळा लोकसभा निवडणूक लढवली आहे. (Simranjit Singh Mann wins from Sangrur Lok Sabha constituency)
पंजाब विधानसभा निवडणुकीनंतर (Punjab Assembly Election) सत्ताधारी आम आदमी पक्षाला संगरूर लोकसभा जागेच्या पोटनिवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या संगरूर जागेवर शिरोमणी अकाली दलाचे (अमृतसर) उमेदवार सिमरनजीत सिंग मान यांनी विजय मिळवला. आप उमेदवार गुरमेल सिंग यांचा 7 हजार मतांनी पराभव केला. गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर मन सरकार बॅकफूटवर गेले आहे.
विजयानंतर सिमरनजीत सिंह मान यांनी फेसबुकवर लिहिले आहे की, धन्यवाद. मान यांना तब्बल 29 वर्षांनी विजय मिळाला आहे. 1999 मध्ये ते संगरूरमधून खासदार झाले होते. यानंतर सर्व विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत सलग पराभवाला सामोरे जावे लागले होते.
आम आदमी पक्षाच्या कुशासनाच्या विरोधात माझ्या पाठीशी उभे राहिलेल्यांचा हा विजय आहे, असे यावेळी मान म्हणाले. ते म्हणाले की, राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळून गेली आहे. लोकांना स्वतःलाच असुरक्षित वाटत आहे. त्यामुळे अननुभवी आम आदमी पक्षाच्या सरकारला त्यांनी धडा शिकवला, येथील आपचे सरकार दिल्लीतून नियंत्रित होत असून येथील जनतेने हे समीकरण नाकारले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.