Gujarat Politics: गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा झटका, सहा आमदार होणार भाजपवासी

या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी, गुजरातमधील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसला आपल्याच पक्षाच्या नेत्यांच्या नाराजीचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी, गुजरातमधील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसला आपल्याच पक्षाच्या नेत्यांच्या नाराजीचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. सौराष्ट्रातील किमान सहा आमदारांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटी (GPCC) च्या माजी अध्यक्षांनी ईटीला सांगितले की या आमदारांनी निवडणुकीसाठी गंभीर आर्थिक मदतीची मागणी केली होती तसेच "काँग्रेस सध्या त्यांची मागणी पूर्ण करण्याच्या स्थितीत नाही आणि आता ते पक्ष सोडण्यास तयार आहेत," ते म्हणाले. (Gujarat Politics Big blow to Congress in Gujarat six MLAs will be from BJP)

Goa Congress
Telangana त खूनी सत्र सुरुच, TRS कार्यकर्त्याची हत्या; संशयितांच्या घरावर दगडफेक

हे नेते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करू शकतात
ईटीच्या वृत्तानुसार सूत्रांनी सांगितले की, भावेश कटारा, चिराग कलगरिया, ललित वसोया, संजय सोलंकी, महेश पटेल आणि हर्षद रिबडिया यांनी यापूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांची भेट घेतली असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील. हार्दिक पटेलचे माजी निकटवर्तीय ललित वसोया, आंदोलनातून प्रसिद्धीझोतात आले आणि ते सर्वात बोलके आणि आक्रमक काँग्रेस आमदारांपैकी एक होते आणि त्यांना सौराष्ट्रात तळागाळात पाठिंबा मिळाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com