Gujarat Elections: 'मला शिव्या देण्यासाठी रामायणातून रावण आणला...', PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

Prime Minister Narendra Modi: दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारसभा घेत आहेत.
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

Gujarat Assembly Elections: गुजरात विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान सुरु झालेले आहे. तर दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारसभा घेत आहेत. यावेळी त्यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या रावणाच्या वादग्रस्त वक्तव्यावर उत्तर दिले आहे.

मोदी म्हणाले की, 'कॉंग्रेस पक्षाला रामसेतुविषयीसुद्धा राग आहे. पंतप्रधान पदाला कमी लेखण्यासाठी कॉग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. माझ्यावर टीका करण्यासाठी कॉंग्रेसने (Congress) रामायणातुन रावणाला आणले.' एका रामभक्ताला रावण म्हणणे चुकीचे आहे, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. लोक जितका चिखल फेकायचा प्रयत्न करतील तेवढे कमळ फुलेल, असेही पंतप्रधान मोदी प्रचारसभेत म्हणाले.

Prime Minister Narendra Modi
Gujarat Assembly Election: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ची 12 उमेदवारांची पाचवी यादी जाहीर

यापूर्वी, कॉग्रेस पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने म्हटले होते की, 'पंतप्रधान मोदींना हिटलरसारखा मृत्यू येईल', तर दुसऱ्या नेत्याने म्हटले होते की, 'ते कुत्र्यासारखे मरतील.' दुसरीकडे, पंतप्रधान मोदींनी कोण झुरळ म्हणते तर कोणी रावण. मात्र, कॉग्रेसला माहीत नाही की, गुजरात रामभक्तांचे राज्य आहे, अशी प्रतिक्रिया भाजपकडून (BJP) आली आहे.

काय म्हणाले होते खर्गे?

गुजरातमधील प्रचारसभेत खर्गे म्हणाले होते की, 'पंतप्रधान मोदी आपल्या लोकप्रियतेवर मतदारांना आकर्षित करतात. पंतप्रधानांना रावणासारखी शंभर डोकी तर नाहीत ना? पंतप्रधान मोदी आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचार करणार का? विशेष म्हणजे, मोदींच्या चेहऱ्यावर भाजप सातत्याने मते मागत आला आहे. कॉर्पोरेशन, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत मोदी प्रत्येक वेळी स्वत:ला पुढे करत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करतात.'

Prime Minister Narendra Modi
विधानसभा निवडणुकीआधी गुजरात सरकारचे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठे 'गिफ्ट'

तसेच, आणखी एका कॉंग्रेस नेत्याने पंतप्रधान मोदींवर सडकून टिका केली. ते म्हणाले होते की, 'आम्ही मोदींना त्यांची लायकी दाखवू इच्छितो.' मात्र, आता प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींनी या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com