Gujarat Election Result: विजयाआधीच भाजपकडून शपथविधीची तारीख निश्चित? मोदी- शहा राहणार उपस्थित

Gujarat Swearing-In Ceremony: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु असून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) दणदणीत विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे.
Narendra Modi & Amit Shah
Narendra Modi & Amit ShahDainik Gomantak

Gujarat Swearing-In Ceremony: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु असून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) दणदणीत विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. दरम्यान, 11 डिसेंबरला नवे सरकार स्थापन होऊ शकते, अशा बातम्या येत आहेत. भाजप सलग सातव्यांदा सरकार स्थापन करणार आहे.

पंतप्रधान मोदी आणि अमित शहा शपथविधीला उपस्थित राहणार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातच्या (Gujarat) नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. याशिवाय भाजपशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्रीही शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकतात.

Narendra Modi & Amit Shah
Gujarat Election Result: गुजरातमध्ये 'आप' चा तिसरी राजकीय शक्ती म्हणून उदय, जाणून घ्या कसा केला कारनामा

भारतीय जनता पक्ष मोठ्या विजयाकडे

गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (BJP) दणदणीत विजयाकडे वाटचाल करत आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत पक्ष 154 जागांवर आघाडीवर होता. त्याचबरोबर गुजरात निवडणुकीत काँग्रेस पक्ष 19 जागांवर आघाडीवर आहे, तर आम आदमी पक्षाने 6 जागांवर आघाडी घेतली आहे. याशिवाय इतर 3 जागांवर आघाडीवर आहेत.

Narendra Modi & Amit Shah
Gujarat Elections: 'या' गावातील मुस्लिमांचा मतदानावर बहिष्कार! गरब्यावर दगडफेक केल्याने...

इतिहासातील सर्वात मोठ्या विजयाच्या दिशेने भाजप

गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) इतिहासातील सर्वात मोठ्या विजयाकडे वाटचाल करत आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकण्याचा विक्रम काँग्रेसच्या नावावर आहे. 1985 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 149 जागा जिंकल्या होत्या. यासोबतच भाजप मतांच्या टक्केवारीतही विक्रम करु शकते. आतापर्यंत भाजपला जवळपास 52 टक्के मते मिळत आहेत, तर काँग्रेसला 34 टक्के आणि आम आदमी पार्टीला (आप) 19 टक्के मते मिळत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com