Gujarat Violence: धार्मिक कार्यक्रमावरून गुजरातमध्ये हिंसाचार; घरांची तोडफोड, 30 वाहने जाळली, 10 जखमी

Gujarat crime and violence: माजरा गावात शुक्रवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास दोन गटांमध्ये दगडफेक आणि जाळपोळ झाली.
Gujarat breaking news today
Gujarat violence newsANI
Published on
Updated on

सांबरकांठा: गुजरातमधील साबरकांठा येथील माजरा गावात शुक्रवारी रात्री दोन गटांमध्ये हिंसाचार झाला. या हिंसाचारात सुमारे १० जण जखमी झाले. तीस वाहने जाळण्यात आली आणि अनेक घरांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी आतापर्यंत २० जणांना ताब्यात घेतले आहे. गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी ध्वज संचलनही केले. साबरकांठा डीएसपी अतुल पटेल म्हणाले, माजरा गावात शुक्रवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास दोन गटांमध्ये दगडफेक आणि जाळपोळ झाली. सुमारे १२० लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा हिंसाचार पूर्ववैमनस्यातून झाल्याचे मानले जात आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण आहे.

Gujarat breaking news today
Goa Crime: जॉब देतो सांगून केला लैंगिक अत्याचार, व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची दिली धमकी; 40 लाखही उकळले

पोलिसांनी सांगितले की, गावात एका धार्मिक कार्यक्रमावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. किरकोळ वाद नंतर दगडफेक आणि हिंसाचारात रूपांतरित झाला. दंगलखोरांनी गावातील मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आणि अनेक वाहने पेटवून दिली

अनेक घरांची तोडफोडही करण्यात आली. हिंसाचारात कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. हिंसक घटनेची तीव्रता लक्षात घेता, जिल्हा पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com