फुटीरतावादी नेते शब्बीर शाह यांच्या JKDFP वर सरकारची मोठी कारवाई, UAPA अंतर्गत घातली बंदी

शब्बीर अहमद शाह यांच्या जम्मू आणि काश्मीर डेमोक्रॅटिक फ्रीडम पार्टीवर (जेकेडीएफपी) केंद्राने पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे.
Shabbir Ahmad Shah
Shabbir Ahmad ShahDainik Gomantak
Published on
Updated on

Shabbir Ahmad Shah: भारतविरोधी आणि पाकिस्तान समर्थक कारवायांमुळे तुरुंगात असलेले फुटीरतावादी नेते शब्बीर अहमद शाह यांच्या जम्मू आणि काश्मीर डेमोक्रॅटिक फ्रीडम पार्टीवर (जेकेडीएफपी) केंद्राने पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे.

एका अधिकृत अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली आहे. पार्टीची स्थापना 1998 मध्ये जम्मू आणि काश्मीरचे प्रमुख फुटीरतावादी नेते शाह यांनी केली होती. शाह यांचा पक्ष JKDFP हा हुर्रियत कॉन्फरन्सचा एक घटक होता. शाह सध्या तिहार तुरुंगात आहेत.

अमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शाह यांना 25 जुलै 2017 रोजी 2005 च्या मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणात अटक केली होती. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एनआयए) शाह यांच्याविरोधात दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे.

गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटले आहे की, "JKDFP चे सदस्य जम्मू आणि काश्मीरमधील फुटीरतावादी कारवायांमध्ये आघाडीवर असून त्यांना एक वेगळे इस्लामिक राज्य निर्माण करायचे आहे. JKDFP च्या सदस्यांच्या नेत्यांवर दहशतवादी (Terrorist) कारवायांचे समर्थन करणे, सुरक्षा दलांना धोका पोहोचवणे असे आरोप आहे.''

Shabbir Ahmad Shah
Jammu And Kashmir: अनंतनागमध्ये कर्नल-मेजर अन् DSP शहीद, काल रात्रीपासून दहशतवाद्यांशी चकमक सुरु

मंत्रालयाच्या वतीने असे सांगण्यात आले की, जेकेडीएफपी आणि त्याचे सदस्य देशाच्या घटनात्मक अधिकार आणि संवैधानिक व्यवस्थेबद्दल पूर्ण अनादर दर्शवतात. शाह बेकायदेशीर कारवायांमध्ये गुंतले आहेत, जे देशाच्या अखंडता, सार्वभौमत्व, सुरक्षा आणि सांप्रदायिक सौहार्दाला धोका पोहोचवतात. प्रतिबंधित दहशतवादी संघटनांशी जेकेडीएफपीचे संबंध दर्शवणारे अनेक इनपुट आहेत, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

Shabbir Ahmad Shah
Jammu And Kashmir: बारामुल्लामध्ये मोठा कट फसला, लष्कर-ए-तैय्यबाचे 3 दहशतवादी गजाआड

मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, केंद्र सरकारने विचार केला की पार्टीच्या हालचाली पाहता, त्याला त्वरित प्रभावाने 'बेकायदेशीर संघटना' घोषित करणे आवश्यक आहे.

2005 च्या मनी लाँड्रिंग प्रकरणात 25 जुलै 2017 रोजी ईडीने शाह यांना पहिल्यांदा अटक केली होती. एनआयएनेही शाह यांचे नाव दहशतवादी फंडिंग प्रकरणात घेतले आहे. ते सध्या दिल्लीच्या तुरुंगात कैद आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com