Anantnag Encounter: जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत देशाचे मोठे नुकसान झाले आहे. या चकमकीत कर्नल, मेजर आणि डीएसपी यांच्यासह तीन अधिकारी शहीद झाले आहेत.
मेजर आशिष धोनक आणि कर्नल मनप्रीत सिंग, डीएसपी हुमायून भट अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत. कर्नल मनप्रीत सिंग 19 राष्ट्रीय रायफल्समध्ये कमांडिंग ऑफिसर होते.
2020 नंतर जम्मू-काश्मीरमधील ही पहिलीच घटना आहे, ज्यात अधिका-यांना आपला जीव गमवावा लागला आहे.
दरम्यान, अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग भागात ही चकमक झाली. गडोले परिसरात लपलेले दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात बुधवारी सकाळी चकमक सुरु झाली.
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवादी (Terrorist) आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या गोळीबारात एक कर्नल आणि एक पोलिस अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, सायंकाळपर्यंत सुरु असलेल्या चकमकीत तीन अधिकारी शहीद झाले.
केंद्रीय मंत्री व्हीके सिंह यांनी ट्विट करत म्हटले की, 'भारतीय लष्कराचे (Indian Army) सेना पदक मिळालेले कर्नल मनप्रीत सिंग काश्मीरमधील अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. या दु:खद बातमीने देश हादरला आहे.
शहीद कर्नल मनप्रीत सिंग यांच्या हौतात्म्याला श्रद्धांजली अर्पण करत, या कठीण काळात त्यांच्या कुटुंबीयांना बळ मिळावे अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो.'
यापूर्वी, काश्मीर झोन पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर एका पोस्टमध्ये म्हटले की, अनंतनागच्या कोकरनाग भागात चकमक सुरु झाली आहे. लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत.
लष्कराच्या म्हणण्यानुसार, दहशतवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीच्या आधारे, 12-13 सप्टेंबरच्या मध्यरात्री लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त ऑपरेशन सुरु केले.
यापूर्वी, मंगळवारी दुपारी राजौरीतील दुर्गम नारला भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली, जी आजही सुरुच होती. या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. या चकमकीत लष्कराचा एक जवान आणि एक स्निफर डॉग शहीद झाला.
याशिवाय, तीन पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना मारण्यासाठी सुरक्षा वाढवली आहे आणि त्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम राबवण्यात आली आहे.
दुसरीकडे, 45 दिवसांत राजौरी आणि पूंछ भागात भारतीय लष्कराने आतापर्यंत 20 दहशतवाद्यांना ठार केले आहे. बहुतांश दहशतवादी पाकिस्तानी होते. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.
राजौरी येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचा मूक योद्धा केंटही शहीद झाला. केंटने आतापर्यंत लष्कराच्या 8 ऑपरेशनमध्ये भाग घेतला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.