स्पर्धा परिक्षा देणाऱ्यांसाठी खूशखबर; मुलाखतशिवाय निवड

गट 1 सेवासंह सर्व विभागांतर्गत घेत असलेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या (State Public Service Commission) परिक्षांसाठी आंध्र प्रदेश सरकारने (Government of Andhra Pradesh) मुलाखत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
APPSC exams
APPSC examsDainik Gomantak
Published on
Updated on

गट 1 सेवासंह सर्व विभागांतर्गत घेत असलेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या (State Public Service Commission) परिक्षांसाठी आंध्र प्रदेश सरकारने (Government of Andhra Pradesh) मुलाखत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा आदेशही जाहीर केला आहे. आंध्र प्रदेश लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेमध्ये सरकार पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करु इच्छित आहे. यासाठीच काळजीपूर्ण तपासणी करुन एपीपीएससी परिक्षांची (APPSC exams) मुलाखत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंध्र प्रदेशचे प्रधान सचिव आदित्यनाथ दास (Adityanath Das) यांनी शनिवारी ही माहिती दिली आहे.

राज्य सरकारकडून यापूर्वी 2019 मध्ये गट 1 वगळता विविध पदांसाठी मुलाखती न घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ज्यामध्ये पोलिस उपधिक्षक, उपजिल्हाधिकारी आणि उपायुक्त या पदांचा समावेश करण्यात आला होता. 18 ऑक्टोबर 2019 रोजी एपीपीएससीने घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये गट-1 गट-2 आणि इरत स्पर्धात्मक परिक्षांसाठी मुलाखती रद्द करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. (Good news for competitive exam takers Selection without interview)

APPSC exams
उत्तरप्रदेश मध्ये एमआयएम सोबत युती नाही - मायावती

मुलाखती रद्द करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. राज्य सरकारने आदेश जाहीर केल्यानंतर गट-1 च्या पदासंह आंध्र प्रदेश लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या सर्व परिक्षांसाठी मुलाखत पध्दत रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संपूर्ण निवड प्रक्रियेमध्ये उमेदवारांना पूर्ण विश्वास आणि पारदर्शकता वाटावी यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.

APPSC exams
'त्या' तक्रारींची दखल: केरळच्या अभ्यासक्रमात हुंडाप्रथेविरोधात धडा

दरम्यान, हा नियम शनिवार नंतर देण्यात आलेल्या भरती अधिसूचनेवरच लागू होईल असेही राज्याचे प्रधान सचिव यांनी सांगितले आहे. या निर्णयामगचा मुख्य उद्देश हा संपूर्ण निवड प्रक्रियेतील प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पूर्ण आत्मविश्वास मिळवणे हा आहे. या सरकारच्या निर्णयानंतर गट-1, गट-2 आणि इतर परिक्षांसाठी कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाही. तसेच हा नियम शनिवार आणि त्यानंतर जाहीर केलेल्या सर्व परिक्षांसाठी लागू असेल, असे प्रधान सचिवांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com