उत्तरप्रदेश मध्ये एमआयएम सोबत युती नाही - मायावती

मागील काही दिवसांपासून राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसपा व एमआयएम यांच्या आघाडी होणार असल्याच बोललं जात आहे
Mayavati
MayavatiDainik Gomantak

आगामी काळात उत्तरप्रदेशमध्ये (Uttar Pradesh) होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची(Assembly Election) जोरदार तयारी सध्या उत्तरप्रदेश मध्ये सुरू आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणात रोज काहीतरी नवीन ऐकायला मिळत आहे. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बहुजन समाज पार्टीच्या (BSP) प्रमुख मायावती (MAYAVATI) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. उत्तरप्रदेश व उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुका बसपा स्वबळावरच लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.

मागील काही दिवसांपासून राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसपा व एमआयएम (AIMIM) यांच्यात आघाडी होणार असल्याच बोललं जात होत मात्र या चर्चा संपूर्णपणे चुकीच्या आहेत, यामध्ये काहीच तथ्य नाही.असं सांगत मायावतींनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Mayavati
"केंद्रीय पथकं दबावाखाली कारवाई करत आहेत" संजय राऊतांचा घणाघात

येणाऱ्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी बसपा आणि ओवेसींचा एमआयएम हा पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार अशी चर्चा रंगली होत पण यावर मायावतींनी स्पष्ट भुमीका घेत या गोष्टी खोट्या असल्याच सांगितलं असून ”माध्यामातील एक वृत्तवाहिनीकडून कालपासून अशी बातमी दाखवली जात आहे की, उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभेची निवडणूक ओवेसींचा पक्ष एमआयएम व बसपा एकत्र मिळून लढणार आहेत. हे वृत्त पूर्णपणे चुकीचे, अफवा पसरवणारे, तथ्यहीन आहे. यामध्ये काडीमात्रही सत्य नाही. ” असं स्पष्ट केलं आहे .

त्याचबरोबर उत्तर प्रदेश सोबतच पंजाब राज्याच्या निवडणुकाही होणार आहेत पण पंजाबमध्ये मात्र बसपाने शिरोमणी अकाली दलासोबत युती केली असून पंजाबमध्ये दोन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत याबद्दलही मायावतींनी माहिती दिली असून "पंजाब सोडून उत्तरप्रदेश व उत्तराखंड मधील पुढील वर्षी सुरू होणाऱ्या विधानसभेची निवडणूक बीएसपी कोणत्याही पक्षाशी आघाडी करून लढणार नाही. म्हणजे, स्वबळावरच निवडणूक लढवणार.”अशी माहिती दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com