तिरुअनंतपुरम: केरळ (Kerala) राज्यात नुकत्याच काही दिवसाआधी हुंडाबळी (Dowry) च्या तीन घटना घडल्या. याच पार्श्वभूमिवर केरळ सरकार (Kerala Government) शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात (Syllabus) हुंडा प्रतिबंध धड्यांचा समावेश करण्यावर विचार करीत असल्याची मागिती मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी माध्यमांना दिली. हुंड्यासंबंधीच्या तक्रारीवरून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. (Lessons included against dowry in Kerala school curriculum)
हुंड्याच्या तक्रारींची विशेष चौकशी करण्यासाठी महिला पोलिस अधीक्षक निशांतनी यांची मुख्य महिला अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. केरळमध्ये नुकत्याच हुंडाबळीच्या तीन घटना घडल्याने माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्नांचा भडीमार राज्यसरकारवर केला. त्याला उत्तरे देताना ‘हुंडा हा सामाजिक धोका आहे आणि युवा पिढीने त्यापासून दूर राहिले पाहिजे. हुंडा प्रतिबंध कायदा राज्यात सहा दशकांपासून अमलात आला आहे. कोणत्याही स्वरूपात लिंगभेदाला मान्यता दिली जाणार नाही आणि मुलीला विक्रीयोग्य वस्तू कदापी समजले जाणार नाही,’ असे विजयन यांनी यावेळी स्पष्ट केले.
केरळमध्ये कोलावलम येथे एका नवविवाहितेला जिवंत जाळण्याचा प्रकार उघडीस आला तर अलापुझ्झा येथे एक विवाहिता मृतावस्थेत आढळली. आणि कोल्लम जिल्ह्यात एकीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी हुंडाबळीचा गुन्हा दाखल झाला असून मृत विवाहितेचा पती अरुण याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अरुणकुमार हा सहाय्यक वाहन निरीक्षक या पदावर काम करत होता. त्याला दोन आठवड्यांची कोठडी सुनावण्यात आली आहे. हुंड्यात दिलेली मोटार ही दहा लाखांपेक्षा कमी किंमतीची आहे, या कारणावरून अरुणकुमार पत्नी व तिच्या आईवडिलांचा सतत अपमान आणि शारिरीक छळ करीत होता. ती गाडी पत्नीच्या नावावर असल्याचीही त्याची तक्रार होती. शिवाय त्यांनी हुंड्यात दिलेले सोने आणि इतर संपत्तीवरूनही तो नाखूष होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.