Gold Silver Price: जागतिक युद्धाचे सावट! अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळण; जाणून घ्या आजचे भाव

Gold Silver Price Today: अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या अनपेक्षित हल्ल्यामुळे आणि राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केल्यामुळे जगभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Gold Silver Price Today
Gold Silver Price TodayDainik Gomantak
Published on
Updated on

Global Crisis Impact on Gold Prices : जागतिक राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. शनिवारी सकाळी अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या अनपेक्षित हल्ल्यामुळे आणि राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केल्यामुळे जगभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम आता सराफा बाजारावर दिसून येत आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदारांचा कल सोन्या-चांदीकडे वाढल्याने आज मौल्यवान धातूंच्या किमतींनी मोठी झेप घेतली आहे.

दरवाढ

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याच्या दरात कमालीची तेजी पाहायला मिळाली. दुपारी १२:२० वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी फ्युचर सोन्याचा भाव १९७२ रुपयांनी वधारून चक्क १,३७,७३३ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचला आहे.

शुक्रवारी सोन्याचा बाजार घसरणीसह बंद झाला होता, मात्र अमेरिकेच्या कारवाईनंतर गुंतवणुकीचा ओघ पुन्हा सोन्याकडे वळला आहे.

Gold Silver Price Today
Goa Theft: फातोर्ड्यात भरदिवसा धाडसी चोरी; कारमधील लॅपटॉप, रोकड आणि कागदपत्रं लंपास; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

चांदीच्या किमतीत सात हजारांची वाढ

केवळ सोनेच नाही, तर चांदीच्या दरातही मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. मार्च कॉन्ट्रॅक्ट असलेल्या चांदीचा भाव आज ६,९१४ रुपयांनी वाढून २,४३,२३० रुपये प्रति किलोग्राम या स्तरावर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या भावात चढ-उतार सुरू होते, मात्र जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे चांदीला पुन्हा एकदा चकाकी आली आहे.

अमेरिकेची कारवाई आणि जागतिक पडसाद

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल' या माध्यमाद्वारे व्हेनेझुएलावर यशस्वी हल्ला केल्याची घोषणा केली. निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेऊन देशाबाहेर नेण्यात आले आहे.

या कारवाईमुळे जग दोन गटांत विभागले गेले असून अनेक देश अमेरिकेच्या या भूमिकेचा निषेध करत आहेत. जेव्हा जेव्हा जागतिक स्तरावर राजकीय अस्थिरता किंवा युद्धाची परिस्थिती निर्माण होते, तेव्हा शेअर बाजारातील जोखीम टाळण्यासाठी गुंतवणूकदार सोन्या-चांदीसारख्या सुरक्षित पर्यायांकडे वळतात. याच 'सेफ हेवन' मागणीमुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

Gold Silver Price Today
Goa Nightclub Fire: 'लुथरा बंधूंना फाशी द्या', बर्च अग्निकांडप्रश्‍नी दिल्लीत निदर्शने; पीडितांच्या नातेवाईकांची जंतरमंतर येथे न्यायाची मागणी

जरी आज सोन्या-चांदीच्या दरात उसळण दिसली असली, तरी हे दर डिसेंबर २०२५ मधील त्यांच्या विक्रमी उच्चांकापेक्षा अद्याप कमी आहेत. डिसेंबर २०२५ मध्ये सोन्याने १,४०,४६५ रुपये आणि चांदीने २,५४,१७४ रुपयांचा ऐतिहासिक टप्पा गाठला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com