Goan Woman Arrested in Uttarakhand: दुचाकी चोरणाऱ्या गोव्याच्या युवतीला अटक; ऋषिकेशमधून पोलिसांनी घेतले ताब्यात

बुलेट नेली होती चोरून
Rushikesh police arrested candy
Rushikesh police arrested candy Google Image
Published on
Updated on

Rishikesh Crime: उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे. ही महिला मूळची गोव्याची आहे. विशेष म्हणजे, पोलिसांनी केवळ 24 तासांत या दुचाकी चोरीचा छडा लावला आहे. ही दुचाकीदेखील जप्त करण्यात आली आहे.

(Goan Woman Arrested in Uttarakhand)

Rushikesh police arrested candy
Porvorim Car Stunt: सर्व दरवाजे उघडून कार चालवणाऱ्या 'त्या' चालकास अखेरीस अटक; पोलिसांनी ठोठावला दंड

उत्तराखंडमधील टिहरी गढवाल जिल्ह्यात ही घटना घडली आहे. रविवारी विहार कॉलनी येथील ब्रह्मानंद भट्ट यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे.

त्यांनी तक्रारीत म्हटले होते की, शनिवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण झुला रोड आनंदधाम आश्रमाजवळ त्याने आपली मोटरसायकल रॉयल एनफिल्ड (बुलेट) रस्त्यावर उभी केली होती. चुकून चावी मोटारसायकलवरच राहिली. तो परत आला असता मोटारसायकल चोरीला गेली होती.

पोलिसांनी या सीसीटीव्ही आणि इतर सोर्समधून माहिती घेत तपास केला आणि चोवीस तासात संबंधित दुचाकी चोराला पकडले. ही चोरी एका युवतीने केली आहे.

Rushikesh police arrested candy
MLA Disqualification Petition: आमदार अपात्रतेबाबत याचिकेवर आता 'या' दिवशी सुनावणी; लोबो, कामत यांना नोटीस

स्टेशन प्रभारी निरीक्षक रितेश शाह यांनी सांगितले की, रविवारी संध्याकाळी हिल बायपास मार्ग तपोवनवर एक महिला रॉयल एनफिल्ड मोटारसायकल घेऊन थांबली होती. ती मोटारसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी संबंधित महिलेला अटक करण्यात आली आहे.

तिचे नाव कँडी असे आहे. ती हणजुणे, गोवा येथील मूळची रहिवासी आहे. संबंधित महिलेच्या गुन्हेगारीच्या माहितीसाठी ऋषिकेशचे पोलिस गोवा पोलिसांशी संपर्क करणार असल्याचे समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com