Porvorim Car Stunt
Porvorim Car Stunt Dainik Gomantak

Porvorim Car Stunt: सर्व दरवाजे उघडून कार चालवणाऱ्या 'त्या' चालकास अखेरीस अटक; पोलिसांनी ठोठावला दंड

कारचालक मुळचा धारवाड येथील
Published on

Porvorim Car Stunt: पर्वरी येथील मॉल दे गोवा या मॉलसमोरील महामार्गावर सर्व दरवाजे उघडलेली कार चालवून स्टंट करणाऱ्या एका कारचालकाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर पोलिसांनी आता कारवाई केली आहे.

संबंधित कारचालकास पोलिसांनी अटक केली असून त्याला दंड ठोठावल्याची माहितीही समोर आली आहे. फाहिद हामजा (वय 37) असे या कारचालकाचे नाव आहे. तो मूळचा शिवानंदनगर, धारवाड, कर्नाटक येथील आहे.

त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आयपीसी आणि मोटार व्हेईकल कायद्यानुसार त्याच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Porvorim Car Stunt
Goa High Court: सावधान! उघड्यावर कचरा टाकताय? हायकोर्टाने हरमल पंचायतीला ठोठावला 50 हजाराचा दंड

या कारचालकाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. रविवारी रात्री हा प्रकार घडला होता. GA 03C 9203 असा या गाडीचा क्रमांक आहे. अशा पद्धतीने कार चालवून स्वतःसह दुसऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न या कारचालकाडून झाला होता.

या वेळी इतर वाहनचालकांनीदेखील या प्रकाराबद्दल रोष व्यक्त केला होता. तसेच कारवाईची मागणी करण्यात येत होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com