Kota News: गुणवंतांच्या शहराला आत्महत्यांचा शाप! MBBS ची तयारी करणाऱ्या दोघांनी एकाच दिवशी संपवले जीवन; वर्षभरातील 15 वी घटना

Kota: राजस्थानच्या कोटा येथे विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत असून, मंगळवारी MBBS प्रवेशाची तयारी करणाऱ्या दोघांनी आत्महत्या केली.
Kota News
Kota NewsDainik Gomantak
Published on
Updated on

2 MBBS aspirants Commits suicide in Kota: राजस्थानमधील कोटा येथे मंगळवारी एमबीबीएस प्रवेश परीक्षेची तायारी करत असलेल्या दोन उमेदवारांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

पहिल्या घटनेत, उदयपूर येथील एका १८ वर्षीय उमेदवाराने मंगळवारी सकाळी वसतिगृहाच्या खोलीत गळफास लावून घेतला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहुल वैष्णव असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो NEET परीक्षेची तयारी करत होता. घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

वैष्णवचा रुममेट घटनेच्या रात्री बाहेर होता. त्यामुळे वैष्णव एकटाच होता. मंगळवारी सकाळी उशिरापर्यंत तो खोलीबाहेर न आल्याने वसतिगृहातील इतरांनी केअरटेकरला याची माहिती दिली.

मित्र आणि सुरक्षारक्षांनी खूप वेळ रूमचे दार वाजवूनही वैष्णव ते उघडत नव्हाता. म्हणून त्यांनी दरवाजा तोडला असता वैष्णव पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

मृतदेह एमबीएस रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला होता. विज्ञान नगर पोलिस स्टेशनचे सर्कल इन्स्पेक्टर (सीआय) देवेश भारद्वाज यांनी सांगितले की, त्याचे कुटुंबीय आल्यानंतर शवविच्छेदन केले जाईल.

Kota News
Agra Crime News: कुऱ्हाडीचे वार अन् धडापासून वेगळे! सुनांच्या भांडणाचा सासऱ्याला संताप; संधी मिळताच केला धाकटीचा घात

अशाच एका घटनेत MBBS प्रवेश परीक्षेची तयारी करत असलेल्या आणखी एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

आदित्य असे या उमेदवाराचे नाव असून, तो दोन महिन्यांपूर्वी कोटा येथे आला होता.

कोटामध्ये गेल्या दोन महिन्यांत एकूण नऊ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, मे महिन्यात अशी पाच आणि या वर्षी जूनमध्ये चार प्रकरणे नोंदली गेली आहेत.

कोटा येथील विद्यार्थ्य्यांच्या संशयित आत्महत्येची ही १३ वी घटना आहे. 2022 मध्ये कोटामध्ये कोचिंगच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची किमान 15 प्रकरणे नोंदवली गेली.

अलिकडील काळातील आत्महत्येचा घटना

अलीकडे, 15 जूनला, कोटा येथे NEET उत्तीर्ण करण्यात अयशस्वी झालेल्या 21 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती.

27 मे रोजी, NEET परीक्षीची तयारी करणाऱ्या 16 वर्षीय विद्यार्थ्याने कोटा येथील वसतिगृहात आत्महत्या केली होत. त्यापूर्वी, 11 मे रोजी उत्तर प्रदेशातील एका 15 वर्षीय विद्यार्थ्याने कोटामध्येच वसतिगृहाच्या खोलीत गळफास लावून घेतला होता.

Kota News
Kerala Crime: ३३ वर्षापूर्वी खून, covid मुळे मृत्यूचा संशय, मग मुंबईत गेल्याची टीप; २७ वर्षापासून चकवा देणारी महिला अखेर जाळ्यात अडकलीच

याआधी २४ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशातील बदायूं येथील एका १७ वर्षीय मुलाने कोटा येथे गळफास लावून आत्महत्या केली होती. तो दोन वर्षांपासून कोटा येथे राहत होता आणि NEET ची तयारी करत होता.

8 फेब्रुवारी रोजी कुन्हडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लँडमार्क सिटी परिसरात एका विद्यार्थिनीने बहुमजली इमारतीच्या 10व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती.

त्याचप्रमाणे 29 जानेवारी रोजी कोटाच्या विज्ञान नगर परिसरात एका विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली उडी मारली होती.

१९ जानेवारी रोजी जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. विद्यार्थ्याने स्वतःवर पेट्रोल ओतून पेटवून घेतले होत.

स्थानिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केल्याने त्याला वाचवण्यात यश आले. दरम्यान, मूळ यूपीचा असणाऱ्या अली राजाने १४ जानेवारीला आत्महत्या केली. तो जेईईची तयारी करत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com