Income Tax Department Raid: 7 कोटींची रोकड, 12 किलो सोने आणि 1100 लॉकर्स... राजस्थानमध्ये IT विभागाचे धाडसत्र!

Income Tax Department Raid In Rajasthan: राजस्थानमधील जयपूरच्या गणपती प्लाझामध्ये काळ्या पैशासंदर्भात आयकर विभागाने छापेमारी केली.
Income Tax Department Raid
Income Tax Department RaidDainik Gomantak

Income Tax Department Raid In Rajasthan: राजस्थानमधील जयपूरच्या गणपती प्लाझामध्ये काळ्या पैशासंदर्भात आयकर विभागाने छापेमारी केली. दोन लॉकर कापण्यात आले आहेत. लॉकरमधून करोडोंची रोकड जप्त करण्यात आली आहे.

दुसऱ्या लॉकरमध्ये नोटांनी भरलेली बॅग सापडल्या. गेल्या महिन्यात राज्यसभा खासदार किरोरी लाल मीना यांनी पेपर लीकद्वारे कमावलेला काळा पैसा या लॉकर्समध्ये ठेवल्याचा आरोप केला होता.

दरम्यान, या प्रकरणातील पहिला छापा 13 ऑक्टोबर रोजी टाकण्यात आला होता. लॉकरधारकांचा डेटा तयार करण्यात आला होता. त्यानंतर 20 ऑक्टोबर रोजी 80 लॉकरधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.

17 ऑक्टोबर रोजी तीन लॉकरमधून 30 लाख रुपये काढण्यात आले होते. 21 ऑक्टोबर रोजी 2.46 कोटी रुपये जप्त करण्यात आले. आतापर्यंत लॉकरमधून 7 कोटी रुपयांहून अधिक रोकड आणि 12 किलोहून अधिक सोने (Gold) जप्त करण्यात आले आहे.

Income Tax Department Raid
UP Income Tax Raid: आयकर विभागाची मोठी कारवाई, 22 ठिकाणी छापे; भ्रष्ट अधिकारी रडारवर

गणपती प्लाझामध्ये सुमारे 1100 लॉकर्स

दरम्यान, गणपती प्लाझामध्ये सुमारे 1100 लॉकर्स आहेत. त्यापैकी 540 लॉकर्स सक्रिय नाहीत. काही लॉकर असे देखील सापडले आहेत, ज्यांच्या मालकाचे नाव आणि पत्ता उपलब्ध नाही. म्हणजेच ज्याच्या नावावर हे लॉकर्स घेतले गेले आहे ती व्यक्ती अस्तित्वात नाही. छाप्यादरम्यान आयकर विभागाने काही महत्त्वाची कागदपत्रेही जप्त केली आहेत.

Income Tax Department Raid
Rajasthan: गोष्ट अशा अजाराची! वर्षातील 300 दिवस झोपतो 'हा' व्यक्ती; कारण जाणून व्हाल थक्क

जे सांगितले होते ते झाले - किरोरी लाल मीना

गणपती प्लाझाच्या लॉकरमधून रोख रक्कम आणि सोने मिळाल्याबद्दल भाजप खासदार किरोरी लाल मीना यांना विचारले असता, 'मी जे बोललो होतो, तेच झाले.' केएल मीना यांनी सातत्याने या प्रकरणावर प्रकाश टाकला होता.

गणपती प्लाझाच्या 100 लॉकरमध्ये 50 किलो सोने आणि सुमारे 500 कोटी रुपयांचा काळा पैसा लपवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. या संदर्भात त्यांनी राजस्थान अँटी करप्शन ब्युरो, आयकर विभाग (Income Tax Department) आणि अंमलबजावणी संचालनालयाकडे तक्रारही केली होती. राजस्थानमधील विविध घोटाळे आणि पेपर लीक घोटाळ्यातून हा पैसा गोळा करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com