Rajasthan: राजस्थानमधून एक अनोखी घटना समोर आली आहे. येथे जोधपूरच्या नागौर जिल्ह्यात राहणारा पुरखाराम वर्षातून 300 दिवस झोपतो. विशेष म्हणजे, त्याचे खाण्यापासून ते आंघोळीपर्यंत सर्व काही झोपेतच होते.
खरे तर, 42 वर्षीय पुरखाराम 'अॅक्सिस हायपरसोमनिया' या अत्यंत दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हा एक मानसिक आजार आहे आणि जगात फार कमी लोकांमध्ये हा आजार दिसून येतो.
नागौर जिल्ह्यातील परबतसर उपविभागातील भडवा गावात राहणारा पुरखाराम एकदा झोपल्यानंतर 25 दिवस उठत नाही. त्याला हा आजार सुमारे 23 वर्षांपूर्वी सुरु झाला. स्थानिक लोक त्याला गावातील 'कुंभकर्ण' म्हणतात.
पुरखाराम याचे स्वत:चे किराणा दुकान आहे, मात्र 25 दिवस झोपल्याने तो महिन्यातून केवळ पाच दिवसच हे दुकान उघडतो.
पुरखारामच्या नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार, आजारपणाच्या सुरुवातीला तो 5 ते 7 दिवस सतत झोपायचा. त्याला उठण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. व्यथित झालेल्या पुरखारामच्या कुटुंबीयांनी त्याला डॉक्टरांकडे नेले.
नातेवाईकांनी सांगितले की, सुरुवातीला कोणत्याही डॉक्टरला (Doctor) त्याच्या झोपेचे कारण समजू शकले नाही. कालांतराने त्याची झोपेची वेळ हळूहळू वाढत गेली. आता स्थिती अशी झाली आहे की, एकदा झोपल्यानंतर पुरखाराम 25 दिवस सतत झोपतो.
पुरखारामने सांगितले की, "डोकेदुखी सुरु होण्याच्या एक दिवस आधी मला समजते की आता दीर्घ झोपेची वेळ आली आहे. एकदा मी झोपलो की मला उठवणे खूप कठीण होते. लोक मला झोपेत खायला देतात. तसेच, झोपेतच माझी आंघोळही होते. मात्र, जेव्हा भूक लागते तेव्हा मला झोप येत नाही.''
पुरखारामने पुढे सांगितले की, "कालच 12 दिवसांनी मला जाग आली. माझी पत्नी लिच्मी देवी हिने खूप प्रयत्नानंतर मला उठवले."
तो पुढे म्हणाला की, "याशिवाय मला दुसरी कोणतीही समस्या नाही. झोपेच्या वेळी मी स्वत:हून उठण्याचा प्रयत्न करतो, पण खूप प्रयत्न करुनही मला का उठता येत नाही, हे कळत नाही. उपचारासाठी अनेक ठिकाणी प्रयत्न केले पण त्याचा काही उपयोग झाला नाही.''
डॉ. बी.आर. जांगीड यांच्या मते, अॅक्सिस हायपरसोमनिया हा एक अत्यंत दुर्मिळ सायकॉलॉजिकल आजार आहे. ज्यामध्ये रुग्ण बराच वेळ झोपतो. जर एखाद्याच्या डोक्यात जुनी गाठ किंवा डोक्याला दुखापत झाली असेल तर त्यालाही असा आजार होऊ शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.