UP Income Tax Raid: आयकर विभागाची मोठी कारवाई, 22 ठिकाणी छापे; भ्रष्ट अधिकारी रडारवर

UP Income Tax Raid: आयकर विभागाने बुधवारी यूपीमध्ये भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई केली.
 Income Tax
Income TaxDainik Gomantak
Published on
Updated on

UP Income Tax Raid: आयकर विभागाने बुधवारी यूपीमध्ये भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई केली. एकाच वेळी आयकर विभागाने 22 ठिकाणी छापे टाकले. दिल्ली व्यतिरिक्त लखनौ आणि कानपूरमध्येही आयकर छापे पडत आहेत. प्रत्यक्षात अनेक भ्रष्ट नोकरशहा आणि विविध खात्यांमध्ये काम करणारे अधिकारी आयकर विभागाच्या रडारवर आहेत. यासोबतच आयकर विभागाने अनेक कंत्राटदारांवरही छापे टाकले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, डझनभर भ्रष्ट नोकरशहा आयकर विभागाच्या (Income Tax) रडारवर आहेत. प्राप्तिकर विभागाच्या कारवाईमुळे उत्तर प्रदेशातील अनेक विभागांमध्ये कार्यरत सुमारे दीड डझन अधिकारी-कर्मचारी रडारवर आले आहेत.

 Income Tax
Digital Assault: निष्पाप मुलीवर डिजिटल बलात्कार करणाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा

Tया विभागांचे अधिकारी रडारवर

उद्योग विभाग, उद्योजकता विकास संस्था, उद्योजकता प्रशिक्षण संस्था, यूपी इंडस्ट्रियल कन्सल्टंट लिमिटेड, खाजगी क्षेत्र, इतर.

आयकर विभागानेही अनेक राज्यांमध्ये छापे टाकले

ऑगस्ट महिन्यात केवळ उत्तर प्रदेशच (Uttar Pradesh) नाही तर इतर अनेक राज्यांमध्ये आयकर विभागाने छापे टाकले. ऑगस्टच्या सुरुवातीस, प्राप्तिकर विभागाला गुजरातमधील एका प्रमुख व्यावसायिक समूहाच्या शोधात 1,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे बेहिशेबी व्यवहार आढळून आले होते. खेडा, अहमदाबाद, मुंबई, हैदराबाद आणि कोलकातामधील 58 ठिकाणांवर सुमारे चार ते पाच दिवस छापे टाकण्यात आले.

 Income Tax
Supreme Court चा मोठा निर्णय, 'कर्नाटकातील ईदगाह मैदानावर गणेशोत्सव होणार नाही'

तर, महाराष्ट्रातील (Maharashtra) जालना येथील एका व्यावसायिकाच्या घरावर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात 390 कोटी रुपयांची रोकड आणि मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत. 260 अधिकाऱ्यांच्या आयकर विभागाच्या पाच पथकांनी आठवडाभर छापे टाकले. हा छापा टाकण्यासाठी एजन्सीने 120 वाहनांचा वापर केला. त्यांच्याकडून सुमारे 58 कोटी रुपये रोख, 32 किलो सोने आणि मौल्यवान रत्ने जप्त करण्यात आली. रोकड मोजण्यासाठी सुमारे 13 तास लागले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com