Charanjit Singh Channi: पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांनी ताज हॉटेलमधून मागवले 'इतक्या' लाखांचे जेवण

RTI मधून उघड झाली माहिती; दिवसाला प्यायचे 2500 रूपयांचा ज्युस
Punjab EX CM Charanjit Singh Channi
Punjab EX CM Charanjit Singh Channi Dainik Gomantak
Published on
Updated on

Charanjit Singh Channi: पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी हे दक्षता ब्युरोच्या रडारवर आहेत. त्यांना लवकरच चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. मुख्यमंत्रिपदाच्या तीन महिन्यांत सरकारी खर्चाने मुलाचे लग्न लावून दिले आणि महागड्या हॉटेलमधून 60 लाख रुपयांचे जेवण मागवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

Punjab EX CM Charanjit Singh Channi
Patna Airport: पाटणा विमानतळावर टळला विमानाचा मोठा अपघात; 170 प्रवासी थोडक्यात बचावले...

माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, चन्नी मुख्यमंत्री असेपर्यंत ताज हॉटेलमधून दररोज 70 लोकांचे जेवण येत होते. माजी मुख्यमंत्री चन्नी यांच्यासाठी ताज हॉटेलमधून 3900 रुपयांची प्लेट आणि 2500 रुपयांचा ज्यूस मागवण्यात आला होता. सलग 3 महिन्यांपासून 70 लोकांच्या जेवणाचे बिल सरकारी खर्चात जोडले गेले आहे. 70 लोक 3 महिने सतत जेवण ऑर्डर करत होते.

याशिवाय चन्नी यांनी निवडणूक प्रचारानंतर एका रात्रीच्या पार्टीसाठी सरकारी तिजोरीतून आठ लाख रुपये खर्च केले आहेत. भटिंडाचे रहिवासी राजविंदर सिंग यांनी चन्नी यांच्याविरोधात दक्षता विभागाकडे आणखी एक तक्रार दाखल केली आहे. 19 नोव्हेंबर 2021 रोजी चमकौर साहिबमध्ये 'दास्तान-ए-शहादत' कार्यक्रम झाला होता. पंजाब सरकारच्या नियमानुसार कोणत्याही निविदेसाठी 21 दिवसांचा अवधी द्यावा लागतो, परंतु या कार्यक्रमासाठी चन्नी सरकारने चार निविदा काढल्या. 17 नोव्हेंबर 2021 रोजी निविदा जारी केल्या आणि त्याच दिवशी निविदा मंजूर केल्या. हे 21 दिवसांपेक्षा कमी कालावधीत केले असेल तर सरकारला कारणे द्यावी लागतील, जी चरणजीत सिंह चन्नी यांच्या सरकारने केली नाही. चारही निविदांमध्ये एकच बोली लावण्यात आली. या कार्यक्रमात सरकारी निधीपेक्षा जास्त पैसे निघाले आणि हे जादा पैसे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या मुलाच्या लग्नाच्या कार्यक्रमात वापरल्याचा आरोप आहे.

Punjab EX CM Charanjit Singh Channi
Captain Shiva Chauhan यांनी रचला इतिहास, पहिल्यांदाच जगातील सर्वात उंच रणांगणावर तैनात

चरणजित सिंह चन्नी यांनी हे सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. ज्या दिवशी मी परदेशातून आलो त्याच दिवशी राज्य दक्षता ब्युरोने मला अटक करण्यासाठी कारस्थान करण्यास सुरुवात केली. मी कधीच दारू पीत नाही, मी शाकाहारी आहे आणि सात्विक अन्न खातो. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जेवण असेल तर ते शेकडो लोक भेटायला यायचे त्यांच्यासाठी यायचे. हे माझ्या बदनामीचे षड्यंत्र असून हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. नोव्हेंबरमध्ये दास्तान-ए-शहादत कार्यक्रमाच्या एक महिना आधी ऑक्टोबर 2021 मध्ये मुलाचे लग्न झाले होते. माझ्या मुलाच्या लग्नाच्या वेळी सरकारी खर्चाची चर्चा झाली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com