Captain Shiva Chauhan यांनी रचला इतिहास, पहिल्यांदाच जगातील सर्वात उंच रणांगणावर तैनात

Captain Shiva Chauhan: आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. देशाच्या संरक्षणातही महिला सक्रियपणे सहभागी होऊन देशाची सेवा करत आहेत.
Captain Shiva Chauhan
Captain Shiva ChauhanDainik Gomantak
Published on
Updated on

Captain Shiva Chauhan: आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. देशाच्या संरक्षणातही महिला सक्रियपणे सहभागी होऊन देशाची सेवा करत आहेत. यातच, कॅप्टन शिवा चौहान ज्यांनी आपल्या कारनाम्यांनी इतिहास रचला आहे. फायर अँड फ्युरी कॉर्प्सचे अधिकारी कॅप्टन शिवा चौहान या सियाचीन ग्लेशियरवरील कुमार पोस्टच्या सर्वोच्च युद्धभूमीवर सक्रियपणे तैनात असलेल्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.

भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करण्यात आले की, "फायर अँड फ्युरी सेपर्सच्या कॅप्टन शिवा चौहान या जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या कुमार पोस्टवर सक्रियपणे तैनात असलेल्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत." कुमार पोस्टवर नियुक्तीपूर्वी शिवा यांना कठोर प्रशिक्षण घ्यावे लागले.

Captain Shiva Chauhan
Jammu And Kashmir: दोन दिवसांत 6 हिंदूंची हत्या, लहान मुलांनाही दहशतवाद्यांकडून केलं जातयं लक्ष्य

सर्वोच्च रणांगण

सियाचीन ग्लेशियर हे पृथ्वीवरील सर्वात उंच युद्धभूमी आहे, जिथे भारत आणि पाकिस्तान 1984 पासून अधूनमधून लढत आहेत. सप्टेंबर 2021 मध्ये, आठ विशेष दिव्यांग लोकांच्या टीमने सियाचीन ग्लेशियरवरील 15,632 फूट उंचीवर असलेल्या कुमार पोस्टवर पोहोचून जागतिक विक्रम केला होता.

Captain Shiva Chauhan
Firing in Jammu & Kashmir: काश्मिरमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात तिघांचा मृत्यू; 10 जखमी

सियाचीन ग्लेशियरचे समोरचे फोटो

फायर अँड फ्युरी कॉर्प्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दोन फोटोही शेअर करण्यात आले आहेत. एका फोटोत शिवा चौहान दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोत त्या इतर अधिकाऱ्यांसोबत दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com