Patna Airport: पाटणा विमानतळावर टळला विमानाचा मोठा अपघात; 170 प्रवासी थोडक्यात बचावले...

पक्ष्याने धडक दिल्याने विमानाचा पंखा चिरडला
Patna Airport:
Patna Airport:Dainik Gomantak
Published on
Updated on

Patna Airport: बिहारच्या पाटणा विमानतळावर मंगळवारी मोठा अपघात टळला. बंगळुरूहून पाटणाकडे येणाऱ्या GoFirst फ्लाइट G8- 274 ला लँडिंगवेळी एक पक्षी धडकला. त्यानंतर मोठा आवाज झाला. पण कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच वैमानिकाने जाणीवपुर्वक विमानाचे सुरक्षित लँडिंग केले. यामुळे विमानातील 170 प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Patna Airport:
Captain Shiva Chauhan यांनी रचला इतिहास, पहिल्यांदाच जगातील सर्वात उंच रणांगणावर तैनात

विमानात पक्षी आदळल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांना मिळताच विमानतळावर एकच खळबळ उडाली. मंगळवारी सकाळी साडेअकरा ते दुपारी बाराच्या दरम्यान हा अपघात झाला.

विमानाच्या उजव्या पंखावर पक्षी आदळताच मोठा आवाज झाला. पक्षाच्या धडकेने विमानाच्या उजव्या पंखाचा काही भाग चिरडला गेला आहे. याशिवाय विमानाचे कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. गो एअरचे हे विमान पाटणाहुन G8-144 बनून दिल्लीला रवाना होणार होते. मात्र पक्षी आदळल्यानंतर ते रद्द करण्यात आले. यानंतर दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांनीही याबाबत विमानतळावर गोंधळ घातला. दरम्यान, डीजीसीएकडून सुरक्षेची खात्री मिळाल्यानंतर विमान पुन्हा उड्डाण करेल.

Patna Airport:
Indian Famous Beaches: भारतातील 'या' बीचवर मिळेल विलोभनीय सूर्यास्त अन् मस्त नाईटलाइफचा आनंद

अद्याप या प्रकरणाबाबत पाटणा विमानतळ प्रशासन आणि गो फर्स्टकडून कोणतेही अधिकृत निवेदन देण्यात आलेले नाही. पाटण्यात पक्षी विमानाला धडकल्याच्या घटना अनेकदा समोर येतात. याचे कारण विमानतळाजवळ प्राणीसंग्रहालय आहे, तसेच विमानतळाच्या आजूबाजूला असलेल्या कत्तलखान्यामुळेही येथे पक्ष्यांची ये-जा जास्त असते. त्यामुळे विमानांना धोका वाढल्याचेही समोर येत आहे. याआधीही पक्ष्यांच्या धडकेने विमानाला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com