S. Jaishankar: 'आम्ही गोष्टी रंगवत नाही...' जयशंकर यांचे अदानी प्रकरणाच्या टीकेवर प्रत्युत्तर

S. Jaishankar: आता भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी जॉर्ज सोरोस यांना उत्तर दिले आहे.
S. Jayshankar
S. JayshankarDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

S. Jaishankar: अमेरिकेचे अरबपती जॉर्ज सोरोस यांनी अदानींच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदींवर निशाना साधला होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अदानींच्या मुद्द्यावर शांत आहेत. त्यांनी सर्व परकीय गुंतवणूकदार आणि संसदेत विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देणे अपेक्षित आहे.

मोदींच्या वागण्यामुळे त्यांची केंद्रीय सरकारवरची पकड कमी होईल. भारतात यानंतर लोकशाहीचे परिवर्तन होईल असे म्हटले आहे. आता भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी जॉर्ज सोरोस यांना उत्तर दिले आहे.

जयशंकर यांनी म्हटले आहे की , जॉर्ज सोरोस हे न्यूयॉर्कमध्ये बसलेले असे व्यक्ती आहेत की, जे आजही असा विचार करतात की त्यांनी जसे म्हटले आहे त्यांच्या विचारांनुसार हे संपूर्ण जग चालत आहे.

S. Jayshankar
China-Pakistan Relation: दगाबाज रे! कंगाल PAK ला चीनने वाऱ्यावर सोडले, पाकिस्तानींना...

वास्तवात असे लोक आपल्या संसाधनाचा वापर कहाण्या तयार करण्यासाठी करतात. अशा लोकांना वाटतं की जर त्यांच्या आवडते नेते निवडून आले तर लोकशाहीचा कारभार उत्तमरित्या सुरु आहे. मात्र त्यांना न आवडणारे नेते जर निवडून आले तर तर त्या देशातील लोकशाहीचे तंत्र व्यवस्थित नसल्याची तक्रार ते करतात.

एस.जयशंकर पुढे म्हणतात, जेव्हा मी माझ्या देशातल्या लोकशाहीच्या तंत्राकडे बघतो तेव्हा ती अद्भूतपूर्ण वाटते. आमच्याकडे म्हणजेच भारतात( India ) जे मतदान होते त्या निवडणूकीच्या प्रकियेवर प्रश्न उपस्थित केले जात नाहीत. आम्ही त्या देशांपासून वेगळे आहोत जे देश निवडणूकीनंतर न्यायालयात मध्यस्ती करायला जातात.

दरम्यान, याआधी केंद्रीयमंत्री स्मृती ईराणी यांनीदेखील जॉर्ज सोरोस यांना खडेबोल सुनावले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Zuari River
Goa Staff Selection Commission fake recruitment advertisement
Maharashtra Crime News
Goa Police Srinivas Naik Investigation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com