नोटबंदीच्या मुद्यावरुन मोदी सरकारला विचारले 'हे' पाच प्रश्न

कॉग्रेसने भाजप सरकार वरती लावले प्रश्नांचे गालबोट
Demonetisation
DemonetisationDainik Gomantak
Published on
Updated on

आज 8 नोव्हेंबर 2021 आहे आणि आज नोटबंदीला (Demonetisation) पाच वर्ष पुर्ण झाली. आजच्याच दिवशी 2016 मध्ये भारताच्या बाजारपेठा मधुन 1000 आणि 500 च्या नोटांचे चलन बंद झाले. नोटाबंदीला ५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काँग्रेस सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रभारी प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारला ५ प्रश्न विचारले आहेत. सोमवारी सकाळी ट्विट करून त्यांनी मोदी सरकारला प्रश्न विचारला आहे की, नोटाबंदी यशस्वी झाली, तर भ्रष्टाचार का संपला नाही?

नोटाबंदीला ५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi Vadra) यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून मोदी सरकारला ५ प्रश्न विचारले आहेत.

1. नोटाबंदी यशस्वी झाली, तर भ्रष्टाचार का संपला नाही ?

2. काळा पैसा परत का आला नाही ?

3. अर्थव्यवस्था कॅशलेस का झाली नाही ?

4. दहशतवादाला दुखापत का झाली नाही ?

5. महागाई आटोक्यात का आली नाही ?

Demonetisation
पंतप्रधान मोदी अन् CM योगींना बॉम्बने उडविण्याची धमकी; ट्विटरवरुन आला संदेश

8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Prime Minister of India) यांनी देशाला संबोधित करताना नोटाबंदीची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर चार तासांनी मध्यरात्रीपासूनच 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर देशात अनेक महिने अराजक माजले होते. मात्र, नंतर रिझर्व्ह बँकेने 2000 आणि 500 रुपयांच्या नव्या नोटा बाजारात आणल्या.

नोटाबंदीमागे सरकारने काळा पैसा परत आणून भ्रष्टाचार संपेल असे कारण दिले होते. यामुळे देशातील रोखीचा ट्रेंड संपुष्टात येऊन कॅशलेसचा कल वाढेल. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, देशात चलनात असलेल्या एकूण नोटांचे मूल्य 4 नोव्हेंबर 2016 पूर्वी म्हणजेच नोटाबंदीच्या घोषणेच्या चार दिवस आधी 17.74 लाख कोटी रुपये होते, जे 29 ऑक्टोबरपर्यंत 29.17 लाख कोटी झाले आहे.

Demonetisation
पश्चिम बंगालमध्ये BJPकार्यकर्त्याची हत्या! कुटुंबीयांनी केला TMCवर आरोप

यासोबतच 2018 च्या एका अहवालात रिझर्व्ह बँकेने म्हटले होते की, नोटाबंदीनंतर जवळपास 99 टक्के नोटा पुन्हा चलनात आल्या. त्याच बरोबर रिअल इस्टेट क्षेत्रातील रोखीच्या व्यवहारात कोणतीही कपात झालेली नाही. डिसेंबर 2018 आणि जानेवारी 2019 मध्ये रिझर्व्ह बँकेने केलेल्या सर्वेक्षणात असेही समोर आले आहे की लोक नियमित खर्चासाठी रोख व्यवहार करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com