पत्रकार झाला दहशतवादी, सापळा रचून सुरक्षा दलाने केले ठार

मारल्या गेलेल्या एलईटी दहशतवाद्याकडे एक प्रेस कार्ड होते, जे स्पष्टपणे मीडियाचा गैरवापर केल्याचे दर्शवते
terrorist Rayees Ahmad Bhat
terrorist Rayees Ahmad BhatANI
Published on
Updated on

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) श्रीनगर (Srinagar) जिल्ह्यातील रैनावरी भागात आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचे दोन दहशतवादी (Terrorist Encounter) ठार झाले. या चकमकीत ठार झालेला दहशतवादी हा पत्रकार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दहशतवादी होण्यापूर्वी तो ऑनलाइन न्यूज पोर्टल चालवत होता.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा दलांनी मध्यरात्री या भागाला घेरल्यानंतर शोध मोहीम सुरू केली होती, त्यानंतर तेथे चकमक सुरू झाली. या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेल्याचे त्यांनी सांगितले. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (IGP) विजय कुमार यांनी सांगितले की, ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाकडे प्रेस कार्ड होते. कुमार यांनी ट्विट केले की, "मारल्या गेलेल्या एलईटी दहशतवाद्याकडे एक प्रेस कार्ड होते, जे स्पष्टपणे मीडियाचा गैरवापर केल्याचे दर्शवते आहे."

या आय कार्डनुसार, ठार झालेला दहशतवादी रईस अहमद भट हा अज्ञात वृत्तसेवा 'व्हॅली मीडिया सर्व्हिस'चा मुख्य संपादक होता. पोलिसांनी सांगितले की, रईस अहमद भट पूर्वी याच नावाने ऑनलाइन न्यूज पोर्टल चालवत होता. पण नंतर तो ऑगस्ट २०२१ मध्ये दहशतवादी बनला. त्याला पोलिसांच्या यादीत क श्रेणीत ठेवण्यात आले होते. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दल त्याच्याविरुद्ध दोन एफआयआरही नोंदवण्यात आले होते. तेथे मारल्या गेलेल्या दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव हिलाल अहमद राहा असे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com