Delhi Muncipal Corporation: दिल्ली महापालिकेत राडा, आप-भाजप नगरसेवकात मारामारी...

स्थायी समिती निवडणुकीत गदारोळ, अनेक नगरसेवक जखमी
Delhi Muncipal Corporation | Fighting between BJP and AAP
Delhi Muncipal Corporation | Fighting between BJP and AAP Dainik Gomantak

Delhi Muncipal Corporation: दिल्ली महानगरपालिकेच्या (एमसीडी) स्थायी समितीच्या निवडणुकीत शुक्रवारी पुन्हा एकदा आम आदमी पक्ष आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली. प्रत्यक्षात मतमोजणीवेळी महापौरांनी एक मत अवैध ठरवले होते.

यानंतर महापौरांनी फेरमतमोजणीचे आदेश दिले. या आदेशानंतर गदारोळ सुरू झाला. नगरसेवकांमध्ये जोरदार लाथा-बुक्क्यांनी मारामार झाली. या भांडणात अनेक नगरसेवक जखमी झाले असून एका नगरसेवकाची प्रकृती बिघडली आहे.

Delhi Muncipal Corporation | Fighting between BJP and AAP
INS SindhuKesari: चीन टेन्शनमध्ये! भारतीय नौदलाच्या पाणबुडीने प्रथमच केली 'ही' अचाट कामगिरी

स्थायी समितीच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांचे प्रत्येकी तीन सदस्य विजयी झाले. या निवडून आलेल्या सदस्यांच्या यादीवर सह्या करण्यास महापौर शेली ओबेरॉय यांनी नकार दिला. त्यांनी एक मत अवैध ठरवून फेरमोजणीचे आदेश दिले.

महामंडळ सचिवांनी फेरमोजणी निर्णयावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. यावरून महापौर आणि मनपा सचिव यांच्यात जोरदार वादावादी झाली.

बाचाबाचीनंतर भाजप नगरसेवकांनी अवैध मत वैध ठरविण्याची मागणी केली असता, महापौरांनी अवैध मत वैध ठरवता येणार नसल्याचे सांगितले. त्यावर भाजप नगरसेवकांनी टेबलावर चढून घोषणाबाजी सुरू केली.

'आप'चे नगरसेवक त्यांना रोखण्यासाठी पुढे गेले असता दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये हाणामारी झाली. गदारोळानंतर महापौर शैली ओबेरॉय यांनी ही निवडणूक पुन्हा 27 फेब्रुवारीला होईल, असे जाहीर केले.

Delhi Muncipal Corporation | Fighting between BJP and AAP
PM Modi In Meghalaya: मोदी, तुमची कबर खोदली जाईल, या टीकेवर काय म्हणाले पंतप्रधान मोदी...

दरम्यान, भाजप नगरसेवकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यासाठी आपच्या नगरसेवकांनी दिल्लीच्या कमला मार्केट पोलिस स्टेशनबाहेर धरणे आंदोलन केले. भाजप नगरसेवकांनी आम आदमी पक्षाच्या महिला नगरसेवकाला मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला.

250 पैकी अवघ्या 242 सदस्यांनी मतदान केले

महापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर दोन दिवसांनी शुक्रवारी स्थायी समितीच्या 6 सदस्यांसाठी मतदान झाले. 250 सदस्यीय MCD मध्ये 242 सदस्यांनी मतदान केले. मतमोजणी सुरू असताना एक मत अवैध ठरल्याने भाजप नगरसेवकांनी फसवणूक, चोर-चोर अशा घोषणाबाजी सुरू केली. त्यावर महापौर शेली ओबेरॉय यांनी फेरमतमोजणीचे आदेश दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com