Crime News: अश्लील व्हिडिओ, दागिने अन् रक्ताळलेला चाकू! भररस्त्यात प्रेयसीला चिरडणाऱ्या नराधमाला ठेचलं; पोलिसांची 'सिंघम' स्टाईल कारवाई

Fatehpur Police Half Encounter Sonu Yadav: आपल्या प्रेयसीची दिवसाढवळ्या चाकूने भोसकून हत्या करणाऱ्या सोनू यादव नावाच्या कुख्यात गुंडाचा पोलिसांनी 'हाफ एन्काउंटर' केला.
Fatehpur Police Half Encounter Sonu Yadav
Fatehpur Police Half Encounter Sonu YadavDainik Gomantak
Published on
Updated on

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली. आपल्या प्रेयसीची दिवसाढवळ्या चाकूने भोसकून हत्या करणाऱ्या सोनू यादव नावाच्या कुख्यात गुंडाचा पोलिसांनी 'हाफ एन्काउंटर' केला. सदर कोतवाली क्षेत्रातील कौडेरवा गावात ही थरारक घटना घडली असून पोलिसांनी चौफेरवा जवळ झालेल्या चकमकीत सोनूला अटक केली.

या कारवाईदरम्यान सोनूने पोलिसांवर (Police) गोळीबार केला, ज्याला प्रत्युत्तर देताना पोलिसांच्या गोळ्या सोनूच्या दोन्ही पायांना लागल्या. जखमी अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सोनू हा एक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

Fatehpur Police Half Encounter Sonu Yadav
Uttar Pradesh Crime: माणुसकीला काळिमा! 'घरात लग्न आहे, अपशकुन होईल...' आईचा मृतदेह घेण्यास मुलाचा नकार, वृद्ध बाप ढसाढसा रडला; अंत्यसंस्कारही झाले नाही

सोनू यादवची गुन्हेगारी पार्श्वभूमी अत्यंत भयानक आहे. त्याच्यावर पॉक्सो कायद्यासह गंभीर स्वरुपाचे चार गुन्हे आधीच दाखल आहेत. तीन वर्षांपूर्वी कल्याणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन, तिच्यावर सामूहिक बलात्कार करुन तिला विहिरीत फेकून देण्याच्या क्रूर गुन्ह्यात तो सामील होता. या प्रकरणात तो जामिनावर बाहेर आला होता. गावात दहशत पसरवणे, लोकांशी मारामारी करणे आणि जमिनींवर बेकायदेशीर ताबा मिळवणे अशा कृत्यांमुळे परिसरात त्याचे प्रचंड नाव होते. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याचे गावातीलच एका महिलेशी प्रेमसंबंध जुळले होते, मात्र हे प्रेमसंबंध लवकरच एका रक्तरंजित संघर्षात बदलले.

Fatehpur Police Half Encounter Sonu Yadav
Uttar Pradesh Crime: 'राजकारण करण्यासाठी येऊ नका'; राहुल गांधींच्या भेटीपूर्वीचा रायबरेली लिचिंग पीडित कुटुंबाचा VIDEO व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, सोनूने संबंधित महिलेचे अश्लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. या ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून त्याने महिलेचे सर्व दागिने आणि पैसे उकळले होते. या त्रासाला कंटाळून महिलेने फेब्रुवारी महिन्यात पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सोनूला चौकशीसाठी बोलावले असता, त्याने महिलेवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. महिलेने आपले दागिने आणि पैसे परत मागितले, जे देण्यास सोनूने नकार दिला. या वादातून संतापलेल्या सोनूने 24 मार्च रोजी ती महिला शेण टाकण्यासाठी घराबाहेर पडली असता, तिचा पाठलाग करुन चाकूने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला.

Fatehpur Police Half Encounter Sonu Yadav
Uttar Pradesh Crime: ‘’ती दुसऱ्या मुलाशी बोलत होती म्हणून...’’; आरोपी तरुणाने दिली गुन्ह्याची कबुली

महिलेच्या हत्येनंतर पोलीस अधीक्षक उदय शंकर सिंग यांनी आरोपीला पकडण्यासाठी तीन पथके तयार केली होती. गुरुवारी रात्री सोनू अंधाराचा फायदा घेऊन गावात परतण्याच्या तयारीत असताना, सर्व्हिलन्सच्या मदतीने पोलिसांनी त्याला घेरले. स्वतःला वाचवण्यासाठी त्याने पोलिसांवर गोळीबार केला, मात्र प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत तो जखमी झाला आणि अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या एन्काउंटरमुळे फतेहपूरमधील गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पीडित कुटुंबाने पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com